अलिबाग (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खारघर मधील राजकीय पक्ष पदाधिकारी, संघर्ष समिती कार्यकर्ते यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची सोमवारी (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी खारघर येथे कायमस्वरूपी दारूबंदी करण्याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये खारघर मधील कायमस्वरूपी दारूबंदी घोषित करण्यासंदर्भात करावयाची शासकीय प्रशासकीय मतदान प्रक्रिया याबाबत चर्चा करण्यात आली. करण्याबाबत राज्य शुल्क अधिकारी व जिल्हाधिकारी रायगड यांनी उभी बाटली आडवी बाटली निवडणूक प्रक्रिया कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. ज्या ठिकाणी निवडणूक घायची आहे तेथून २५ टक्के मतदारांचे निवडणुकीसाठी अर्ज केल्यास मतदान घेतले जाईल. विधानसभेची मतदार यादी या प्रक्रियेसाठी वापरण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राबवण्यात येईल, असे जिल्हा...