पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य व नेतृत्वगुण विकसित व्हावेत या उद्देशाने कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी पनवेल परिसरातील विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. त्या अनुषंगाने १६,८८७ पैकी २०२५ विद्यार्थी शाळा अंतर्गत फेरीसाठी पात्र ठरले असून ते या फेरीसाठी सज्ज झाले आहेत.
आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे, चांगु काना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल (इंग्रजी माध्यम), चांगु काना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल (मराठी माध्यम), सुषमा पाटील विद्यालय कामोठे, लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय कामोठे, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुर्बी, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खारघर, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा, केएसए बार्न्स स्कूल, पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ०१ ते ११ शाळा आदी शाळांचा सहभाग आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एकूण १६,८८७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि ४०५ वर्गांमधून निवड झालेल्या २०२५ विद्यार्थी शाळा अंतर्गत फेरीसाठी अर्थात दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्या अनुषंगाने विशेषतः आजपासून लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल, कामोठे आणि लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, कामोठे येथे शाळा अंतर्गत फेरीला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी माझं स्वप्न, माझं कुटुंब, शिक्षणाचं महत्त्व, स्वच्छ भारत, प्लास्टिक मुक्त भारत अशा विषयांवर आपले विचार ठामपणे मांडले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मुख्याध्यापक तथा रायगड विभागीय अधिकारी एम. के.कोंगेरे, स्पर्धा प्रमुख व कोशिश फाउंडेशनचे उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, शिक्षक अनिल पाटील, दीपक खुटले, श्री. पेरवी यांच्यासह कोशिश फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते.
कोट-
विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोशिश फाउंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्तम तयारीसह विचार मांडले असून पुढच्या फेरीसाठी ते अजून सज्ज होत आहेत. - एम. के. कोंगेरे- मुख्याध्यापक तथा रायगड विभागीय अधिकारी कामोठे पनवेल
कोट-
"विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज आहे. वक्तृत्वकला म्हणजेच नेतृत्व कलेचा पाया आहे.त्यामुळे हि स्पर्धा विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची उत्तम संधी आहे. - मयुरेश नेतकर, स्पर्धा प्रमुख व उपाध्यक्ष कोशिश फाउंडेशन
Comments
Post a Comment