रयत शिक्षण संस्थेसाठी स्व. माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे मोठे योगदान- खासदार शरदचंद्र पवार, माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
नावडे (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे रोपटे रायगड जिल्ह्यात आणून या रोपट्याचे वटवृक्ष करण्याचे काम स्व.मा. आम.दत्तूशेठ पाटील आणि त्यांचे सहकारी स्व. जनार्दन भगत,स्व.दि.बा. पाटील यांनी केले. असे प्रतिपादन देशाचे माजी कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार साहेब यांनी केले ते ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता नावडे येथे प. जो. म्हात्रे हायस्कूल आणि आत्माराम धोंडु म्हात्रे जूनियर कॉलेजच्या पटांगणामध्ये माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्व.दत्तूशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शेकाप चे सरचिटणीस जयंत भाई पाटील, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू आणि रयत चे संघटक अनिल पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. शरद पवार साहेब पुढे म्हणाले दत्तूशेठ पाटील आणि आमचे घरोब्याचे संबंध आहेत, आम्ही दोघांनीही विधिमंडळामध्ये काम केले आहे. दत्तूशेठ पाटील यांचा वारसा बाळाराम पाटील त्याच निष्ठेने चालवत आहेत. दहा वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या कोकण विभागाची जबाबदारी बाळाराम पाटील यांच्यावर सोपवली गेली असून ते आज पर्यंत मोठ्यानिष्ठेने पार पडत आहेत.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले विधिमंडळामध्ये अजित दादांच्या सोबत रोहित दादांच्यासोबत काम करता आलं सुप्रियाताईंच मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या सोबत काम करता आलं दोन पिढ्यांची ही वाटचाल निश्चितपणाने माझ्या या आयुष्याला वेगळं वळून घेऊन गेले आणि कामाच्या बाबतीत आपण किती काम करू शकता याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपला दिनक्रम बघितल्यानंतर मिळाली.आपल्या आदर्शावर काम करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करतोय अनेक राजकीय स्थित्यंतरे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला पहावी लागतायत पण तात्यांच्या आयुष्याच्यासारीपाट सामोरा आणला की माझ्यासारखा कार्यकर्ता मनाने तयार होतो की किती त्रास झाला तरी पक्ष सोडणार नाही. तात्यांनी दिलेली कार्यसंस्कृती सोडणार नाही आणि त्यांच्या आदर्शावर काम करण्याचा प्रयत्न मी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात निश्चितपणे करीत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंत पाटील आणि जिल्ह्यातील तालुक्यातील कार्यकर्ते या संकटकाळी माझ्या पाठीशी उभे आहेत याचमुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी सांगितले पाटील हे सभागृहामध्ये नेहमी शांत असत पण जेव्हा बोलत ते मार्मिक बोलत असे. ते पुढे म्हणाले मी पवार साहेबांचा खूप आभारी आहे कारण त्यांनी या भागात रयत शिक्षण संस्थेची शाखा उभारण्यास मदत केली त्याकडे रायगड जिल्ह्यात फक्त कोकण एज्युकेशन सोसायटीच होती. ते पुढे म्हणाले रयत शिक्षण संस्थेसाठी पनवेल मधील रामशेठ ठाकूर यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर यांचे विचार रुजवायचे असतील तर शरद पवार साहेबांपेक्षा दुसरा पर्याय नाही. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितले रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून महाराष्ट्रावर त्याच्या शाखा आहेत. आणि या सर्व विभागात आणि सर्व क्षेत्रात रायगड विभागाचा प्रथम क्रमांक लागतो
Comments
Post a Comment