उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट व गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मोफत वह्या व खाऊचे वाटप
खारघर/प्रतिनिधी दि.२६-आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगर संघटक गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा मुर्बी गाव खारघर येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या व खाऊचे वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, शहर प्रमुख गुरू म्हात्रे, रामचंद्र देवरे, राजेश बेर्डे, आयोजक व उपविभाग प्रमुख दत्ता दळवी, विभाग प्रमुख उत्तम मोरबेकर, आनंद व्हावळ, संतोष शिंदे, संतोष कट्टीमणी महिला आघाडी उपशहर संघटिका सौ. प्रिया वाडकर, विभाग संघटिका हूसणारा खान यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment