पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू झाल्याने पनवेलकरांमध्ये आनंदाचे वातावरण - जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे
पनवेल दि. १९ (वार्ताहर) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने गेल्या वर्षाभरापासून पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करत होतो. त्याला अखेर यश येऊन आयुक्त मंगेश चितळे यांनी हि योजना लागू केल्याने पानवेलकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयावर सातत्याने प्रयत्न केले होते व अखेरीस हि योजना मंजूर झाल्याने महायुतीने दिलेले आश्वासन पूर्ती करत असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी कळंबोली येथे बिमा कॉम्प्लेक्स याठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, पनवेल महानगरप्रमुख ऍड प्रथमेश सोमण, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक, कामोठे शहरप्रमुख सुनील गोवारी, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, नवीन पनवेल शहरप्रमुख अतुल मोकल, तळोजा शहरप्रमुख विशाल पवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितले कि, पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांची दीर्घकाळाची मागणी अखेर मान्य झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील लावलेली शास्ती तातडीने अभय योजना लागू करुन रद्द करावी यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख ऍड प्रथमेश सोमण व इतर पदाधिकारी व इतर सामाजिक संस्था शासनाकडे पाठपुरावा करत होते. याबाबत मुंबई यथे बैठकसुद्धा झाल्या. या बैठकीमध्ये प्रधानसचिवांनी शास्तीमाफीचा विषय़ आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने त्यांनी याबाबत निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेत शास्तीमाफी योजना सुरु केली आहे असे त्यांनी सांगितले. असे असले तरी इतरही अनेक प्रश्न करमाफी संदभार्त प्रलंबित आहेत. महायुतीच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे असे त्यांनी सांगितले.
तर या वेळी बोलताना पनवेल महानगरप्रमुख ऍड प्रथमेश सोमण यांनी सांगितले कि, पनवेल महानगर पालिकेने अखेर शास्ती कर माफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पनवेल शिवसेनेतर्फे शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारचे आम्ही आभार मानत आहोत. शास्ती माफ करण्याचा सर्वप्रथम निर्णय वा घोषणा उपमुख्यमंत्री यांनीच केली होती.मंत्रालयात यासंबंधीच्या बैठकही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने झाल्या आहेत, असेहि सोमण यांनी सांगितले. तर उपजिल्हाप्रमुख परेश पाटील यांनी या योजनेचा ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment