पनवेल,दि.14: पनवेल महानगरपालिका उद्यान विभाग आणि रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईस यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ जुलै २०२५ रोजी खारघर येथील सेक्टर ७ जवळील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आयुक्त श्री. मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा आणि नागरिकांना मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका उद्यान विभागामार्फत सुरू आहे.
या कार्यक्रमांतर्गत रस्त्याच्याकडेला करंज, कदंब अशा २५ वृक्षांचे रोपण करण्यात आले.सहा. आयुक्त डॉ. रूपाली माने व उद्यान विभागप्रमुख अनिल कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागातील उद्यान पर्यवेक्षक नितीन राठोड, रुपेश चित्रुक, सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक वैभव ठाकरे यांचे या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment