Skip to main content

लाडकी बहिण‌’ महालेखापालांच्या रडारवर ?

 ‌


मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर महायुती सरकारने राज्यात लागू केलेल्या ‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना‌’ यातून लाखो लाभार्थ्याना अपात्र ठरवण्यात आले आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे लाभार्थ्याच्या पात्रतेची पडताळणी न करता घिसडघाईने महायुती सरकारने राबवलेल्या या योजनेचे लेखापरिक्षण करावे अशी मागणी महाराष्ट्राचे महालेखापाल (कॅग) यांचेकडे सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी  केली आहे. त्यामुळे पात्रतेच्या निकषांची अंमलबजावणी न करता अंतिम यादी जाहीर करणारी जिल्हासमिती व अंधाधुंद खिरापत वाटणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी मध्यप्रदेश सरकारच्या धतवर महाराष्ट्रात ‌‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजना‌’ सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. त्याची अधिसूचना २८ जून २०२४ रोजी राज्याच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. या योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांचे सशक्तीकरणास चालना देणे व त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा आहे. या योजनेचा लाभाथ राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या व निराधार महिला असून वयाची २१ वर्ष व कमाल वयाची मर्यादा ६५ वर्ष ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर ज्या कुंटुंबांचे एकत्रित उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त असेल, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची नावावर चारचाकी वाहन आहे अशा महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. या योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती बनवण्यात आली असून संबंधित जिल्हाधिकारी यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. या समितीमार्फतच लाथार्थ्यांची स्वतंत्र यादी जाहीर करण्यात येणार होती. 

राज्य सरकारने ३ जुलै २०२४ रोजी या योजनेत अनेक बदल करुन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री व सह अध्यक्षपद संबंधित जिल्ह्याचे मंत्री यांना देण्यात आले. या समितीने अंतिम यादी प्रकाशन १ ऑगस्ट २०२४ रोजी केले असून शासनाने सर्व लाभार्थ्यांना 1 जुलै २०२४ पासून लाभ देण्यास सुरुवात केली. या योजनेत सूमारे २ कोटी ६० लाख महिला लाभाथ असल्याचे बोलले जात असून त्या अनुषंगाने महिना  ३५०० कोटी जुलै २०२४ ते मे २०२५ पर्यत अनुदान वाटप करण्यात आले आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीबाबत अनेक वर्तमानपत्रात बातम्या आल्या असून त्यामधून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या २ लाख ३० हजार महिला, ६५ वर्षापेक्षा जास्त असलेल्या १ लाख १० हजार तर कुटुंबांच्या नावे चारचाकी असलेल्या व अन्य योजनेचे लाभाथ तसेच स्वेच्छेने माघार घेणाऱ्या १ लाख ६० हजार लाभार्थ्याना अपात्र करण्यात आले आहे. या योजनेत २६५२ लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी निघाल्या आहेत. उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहिण योजना राबवण्यात चुक झाली असे सांगत आतापर्यंत एकुण १२ लाख ७२ हजार ६५२ बहिणी अपात्र ठरल्याचे सांगितले आहे. शासनाने नुकतेच अपात्र बहिणींच्या शोधासाठी प्राप्तीकर विभागाशी करार केला असून राज्य सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची यादी प्राप्तीकर विभागाकडे सुपुर्द केली आहे. या पडताळणीनंतर अनेक बहिणी अपात्र ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या सर्व बातम्यांची दखल सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी घेऊन या योजनेचे लेखा परीक्षण तातडीने करण्यात यावे अशी मागणी राज्याचे महालेखापाल यांच्याकडे केली आहे. आपल्या तक्रारीत जाधव यांनी सदर योजनेसाठी अर्थसंकल्पात योग्य ती तरतूद केली नसतानाही सरकार इतर योजनांचा निधी या योजनेसाठी वापरत असून हा अन्य घटकांवर अन्याय असल्याचा आरोप केला आहे. सरकार या योजनेची माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर ठेवत नसल्याने व यातून वारेमाप पैसा अपात्र लाभार्थ्यावर उधळला जाण्याची शक्यता असल्याने या योजनेचे तातडीने लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. हे लेखापरीक्षण झाल्यास योजनेतील आर्थिक अनियमितता बाहेर येईल अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे. जाधव यांच्या मागणीला राज्याचे महालेखापाल कसा प्रतिसाद देतात याकडे आता राज्याच्या लाडक्या बहिणींसह ही योजना बेदकारपणे राबवून जनतेचे पैसे राजकीय दबावापोटी उधळणाऱ्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


 २१०० कोटींची उधळण

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीवरुन आतापर्यंत १२ लाख ७२ हजार ६५२ लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यांना जुलै २०२४ पासून आतापर्यत २१०० कोटी रुपयांचे वाटप या योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. हे पैसे परत घेणार नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे २१०० कोटी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. 

सदर योजनेसाठी अर्थसंकल्पात योग्य ती तरतूद केली नसतानाही सरकार इतर योजनांचा निधी या योजनेसाठी वापरत आहे.हा अन्य घटकांवर अन्याय आहे. सरकार या योजनेची माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर ठेवत नसल्याने व यातून वारेमाप पैसा अपात्र लाभार्थ्यावर उधळला गेल्याची शक्यता असल्याने या योजनेचे तातडीने लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. हे लेखापरीक्षण झाल्यास योजनेतील आर्थिक अनियमितता बाहेर येईल. त्यामुळे राज्याच्या महालेखापालांकडे तक्रार करुन लेखापरीक्षणाची मागणी केली आहे.      - संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते



Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...