पनवेल (प्रतिनिधी )जिद्द आणि चिकटीच्या जोरावर आम्ही सर्वजण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकलो. तुम्हीही थोरा-मोठ्यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेऊन यशस्वी व्हा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना केले.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष उलवे नोड-२ यांच्या वतीने ‘रयत’च्या गव्हाण येथील येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. त्यांनी मंचावर उपस्थित असणार्या विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीपासून विद्यार्थ्यांनी स्फूर्ती घ्यावी, असे आवर्जून सांगितले.
या समारंभास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष, गव्हाण विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी सदैव मदतीचा हात देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणवत्ताधारक व्हावे यासाठी याआधी गतवर्षी विद्यालयास १५ लाख रुपयांच्या देणगीतून १५ इंटरअॅक्टिव्ह पॅनेल दिले आहेत. उर्वरित वर्गखोल्यांसाठीदेखील नऊ लाख रुपयांचे नवीन नऊ इंटरअॅक्टिव्ह पॅनल बसवून देण्याचे या वेळी बोलताना त्यांनी जाहीर केले.
विद्यालयाच्या नवनिर्वाचित प्राचार्य तसेच ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर यांनी प्रास्ताविकात गव्हाण विद्यालयाच्या वाटचालीबद्दल माहिती देत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयासाठी केलेल्या विकासात्मक कामांची सविस्तर माहिती दिली आणि त्यांना धन्यवाद दिले.
वाय.टी. देशमुख, जे.एम. म्हात्रे, अरुणशेठ भगत यांनीदेखील स्वतःच्या शालेय जीवनातील विविध उदाहरणे देत शाळा व शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी अधिक अभ्यास करावा यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, भाऊशेठ पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, अमर म्हात्रे, निलेश खारकर, भाऊ भोईर, वामन म्हात्रे, हेमंत ठाकूर, भार्गव ठाकूर, किशोर पाटील, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष कुंदन मोकल, उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, सुहास भगत, सुधीर ठाकूर, कमलाकर देशमुख, विनायक कोळी, सुदर्शन घरत, महेश घरत, रामदास पाटील, योगिता भगत, उषा देशमुख, मीनाक्षी पाटील, निकिता खारकर, सुजाता पाटील, अमर घरत, जयवंत देशमुख, रोशन म्हात्रे, सागर ठाकूर, गोपाळ भगत, बी.टी. कांबळे, पी.के. ठाकूर, गव्हाण विद्यालयाच्या प्राचार्य ज्योत्स्ना ठाकूर, उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे, पर्यवेक्षिका शशिकला पाटील, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख संजय उगले, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी.एन.घरत जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या मुख्याध्यापिका सायली वडवळकर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रणिता गोळे, पर्यवेक्षक अरुण जोशी तसेच संस्थेच्या फुंडे येथील ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख बाबुलाल पाटोळे, राजू खेडकर आणि गव्हाण पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक सागर रंधवे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रवींद्र भोईर यांनी मानले
Comments
Post a Comment