Skip to main content

लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीची बैठक संपन्न



पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात आज महाविद्यालय विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे विकास समितीचे प्रमुख व रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची तर ऑनलाईन प्रणालीने रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथकाका शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत या बैठकीला लाभली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालय विकास व आर्टिफिशियल इंटेलिजन्स करिता ३० लाख रुपयाची देणगी जाहीर केली. यामुळे मोखाडातील विद्यार्थ्यांना एआय या आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. तसेच यावेळी आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा, असा ठराव महाविद्यालयाच्या विकास समितीने सर्वानुमते या बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजूर केला. 

             या बैठकीला पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, संस्थेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे सह सचिव बंडू पवार व संस्थेचे इतर पदाधिकारी, आश्रम शाळेचे प्रकल्प अधिकारी, प्र. प्राचार्य डॉ.ए. एन. चांदोरे, व महाविद्यालयाचा सर्व स्टाफ तसेच विकास समितीचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          


सर्वप्रथम महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालयाची पाहणी केली. त्यानंतर महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या रंगमंचाचे व प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील वेगवेगळ्या विकासात्मक कामाचे निरीक्षण करून आवश्यक त्या पुढील सूचना दिल्या. यावेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने तारपा नृत्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या आदिवासी भागातील विद्यार्थी पुढे जावा त्याच्या शिक्षणामध्ये सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात. या दृष्टीने विचार करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालय विकास व आर्टिफिशियल इंटेलिजन्स करिता ३० लाख रुपयाची देणगी जाहीर केली त्याबद्दल संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथकाका शिंदे व महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच या बैठकीमध्ये आदिवासी भागामध्ये आदरणीय रामशेठ ठाकूर यांचे विशेष शैक्षणिक योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या विकास समितीने त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी सर्वानुमते या बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजूर करण्यात आला व सदर प्रस्ताव महाविद्यालयाच्या वतीने संस्था पातळीवर पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहे. सध्या महाविद्यालयामध्ये चालू असलेले वेगवेगळे उपक्रम व पुढील वाटचालीस महाविद्यालयाचे विकास समितीचे प्रमुख व ॲड. भगीरथ काका शिंदे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. या बैठकीचे आभार प्रा. एस. ए. फुंदे यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...