पनवेल प्रतिनिधी : नावडे येथील रयत शिक्षण संस्थेचे परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय व आत्माराम धोंडू म्हात्रे जुनिअर कॉलेज व आयटीआय या ठिकाणी माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ : ०० वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंतभाई पाटील उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी ४ जुलै २०२५ रोजी नावडे हायस्कूल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली. या पत्रकार परिषदेला पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिका चिटणीस प्रकाश म्हात्रे,काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, पंढरीनाथ पाटील, मोहन गंधारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पुढे सांगितले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत दळवी (चेअरमन, रयत शिक्षण संस्था) , बाबासाहेब देशमुख (विधानसभा सदस्य, सांगोला) , श्रीकांत देशपांडे (माजी विधान परिषद सदस्य) ,एड. भगीरथ शिंदे, किशोर दराडे (विधानपरिषद सदस्य) , माजी आमदार जयंत पाटील (सरचिटणीस शेकाप) , डॉ. अनिल पाटील, विकास देशमुख, दत्तात्रय सावंत (माजी विधान परिषद सदस्य) यांच्यासह रयत शिक्षण संस्था रायगड चेअरमन, मुख्याध्यापक, स्थानीक सल्लागार समिती, शिक्षक, माजी विद्यार्थी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल, उरणचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांनी पनवेल व उरण मतदार संघामधून १९७९ , १९८५, आणि १९९० असे तीन वेळा सलग विधानसभेचे आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आले व तसेच आगरी समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्यात तात्यांचे मोलाचे योगदान आहे अशी माहिती कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Comments
Post a Comment