श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सुकापूर शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सुकापूर येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना आज वह्यांचे वाटप करण्यात आले. भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले असून त्यांनी मार्गदर्शन करत वह्यांचा वापर करून चांगला अभ्यास करून आपले भविष्य उज्वल करावे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षांपासून दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांची मदत करण्याचे काम होत आहे.त्यानुसार मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यांदाही गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येत आले. मंगळवारी सुकापूर येथील रायगड एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लीश स्कूल आणि सेंट मेरी स्कूलमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल तालुका पूर्व मंडल अध्यक्ष भुपेंद्र पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच बुवाशेठ भगत, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, तालुका चिटणीस यतिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, महेश पाटील, आत्माराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हनुमंत खुटले, शशीकांत पाटील, चंद्रकांत पोपेटा, उदय म्हस्कत, राहुल पोपेटा, निळकंठ पाटील, मीना साजवान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment