पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर (सीकेटी स्वायत्त) महाविद्यालयात संस्थेचे प्रेरणास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांचा पुण्यस्मरण दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. १३) सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद महादेव कारंडे आणि आमदार तथा कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रशांत ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत, अनिल भगत, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे . प्राचार्य डॉ. एस.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आर.डी. म्हात्रे, डॉ. एस.एन. पारकाळे, प्रा. डॉ. बी. डी. आघव आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि संस्थापकांच्या स्मृतींचा सन्मान करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Comments
Post a Comment