पाणीपुरवठ्यात सुधारणा होईपर्यंत नवीन प्रकल्पांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नका - आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको एमडी विजय सिंघल यांच्याकडे मागणी
पनवेल (प्रतिनिधी) सिडकोने इमारती प्रकल्प उभारली मात्र नियोजनाअभावी पाणी पुरवठा करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्या कारणाने सिडकोच्या वसाहती भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत पाणीपुरवठ्यात योग्य प्रकारे सुधारणा होत नाही, तोपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना सीसी ओसी मंजुरी देऊ नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर पाण्यासंदर्भात अशीच स्थिती राहिली तर लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्व नागरिकांना घेऊन सिडको विरोधात तीव्र जनआंदोलन उभारीन असा ईशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात निवेदनही दिले असून त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, “पाणीपुरवठा विभागातील अधिकारी गंभीरतेने काम करत नसल्याने नागरिकांना सणासुदीच्या काळातही पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी सण-उत्सवाच्या काळात पाणीपुरवठा खंडित होतो, त्यामुळे काही अधिकारी मुद्दामून नागरिकांना अडचणीत टाकत आहेत का, अशी शंका निर्माण झाली आहे.” त्या...