Skip to main content

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनचा अंतिम टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या विकासाचे नवे इंजिन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* 


नवी मुंबई,दि. 8 (विमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही, तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्क्यांची वाढ करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन संपन्न झाले. या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू, वने मंत्री गणेश नाईक, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जपानचे राजदूत ओनो केइची, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासह खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

      मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. जे प्रकल्प स्वप्नरूपात होते, गेली दहा वर्षे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ते आज वास्तवात उतरले आहेत. नवी मुंबई विमानतळाची संकल्पना 1990च्या दशकात झाली असली, तरी अनेक वर्षांपासून ती केवळ कागदावरच होती. प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘प्रगती’ उपक्रमाअंतर्गत या प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर सर्व आवश्यक परवाने मिळवण्यात यश येऊन कामाला वेग आला. हे विमानतळ दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

       विमानतळाबरोबरच अटल सेतू, 40 किमी लांबीची भूमिगत मेट्रो ही प्रकल्पही जलद गतीने पूर्ण झाले आहेत. या मेट्रोच्या निर्मितीत जपान सरकार आणि जायका संस्थेचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी ‘मुंबई वन’ या सर्वसमावेशक वाहतूक ॲपद्वारे मेट्रो, मोनोरेल, बस, उपनगरी रेल्वे आणि वॉटर टॅक्सी या सर्व वाहतूक साधनांसाठी एकाच तिकीटाची सुविधा मिळणार आहे. तसेच, तरुणांसाठी कौशल्य विकास विभागाच्या नव्या योजना जाहीर करण्यात आल्या असून, विमानतळ आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

      मुख्यमंत्री म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला उपहार असून याच ठिकाणी देशातील पहिला ऑफशोर विमानतळ तयार करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चौथी मुंबई तयार होणार आहे. 


महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

*नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विविध विमाने टेक-ऑफ आणि लँडिंग करतात, पण भारताला आत्मनिर्भर आणि महासत्ता बनवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली प्रगती आणि विकास घेऊन आले आहे. नवी मुंबई हे केवळ विमानतळ नाही, तर नवीन भारतावरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून फक्त विमानांचे उड्डाण होणार नाही, तर एक मजबूत आणि आत्मनिर्भर भारत उभारला जाणार आहे. 21 व्या शतकात मोदीजींनी देशाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा देशात केवळ 74 विमानतळ होते. गेल्या दहा वर्षांत ही संख्या दुप्पट होऊन 150 वर पोहोचली असून 2030 पर्यंत ती 220 करण्याचा संकल्प प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.


देशातील सर्वात लांब भुयारी मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा देखील त्यांनी दाखवला होता. उत्तर आणि पश्चिम मुंबईला दक्षिण मुंबईशी भुयारी मार्गाने जोडणारी ही मेट्रो पायाभूत सुविधांचा उत्तम नमुना आहे. पुढील दोन-चार वर्षांत सर्व मेट्रो लाइन सुरू होतील आणि मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फक्त एका तासात पोहोचता येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्यामुळे देशातील प्रमुख पायाभूत प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत. राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने तब्बल 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’ हा दिलेला शब्द पाळला असल्याचे श्री.शिंदे यांनी नमूद केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने पीएम किसान सन्माननिधी योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 33,565 कोटी रुपये दिलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


*व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार - उपमुख्यमंत्री अजित पवार*


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


आज लोकार्पण झालेली मेट्रो-3 मार्गिका म्हणजे मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे. ‘कुलाबा-बांद्रा-सीप्झ’ हा मार्ग सुरु झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे. मेट्रो लाईन-3 च्या ‘फेज 2-बी’च्या उद्घाटनाने मुंबईला नवी गती मिळणार आहे. ही भुयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही, तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबरीने वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यकत् केला. 


 ‘मुंबई वन’हे ॲप म्हणजे ‘वन मुंबई, वन ॲप या संकल्पनेची झलक आहे. हे ॲप मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ, सुत्रबध्द आणि स्मार्ट बनविणार असणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


त्याचबरोबर आज सुरु होत असलेले अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हे आपल्या युवकांसाठी आशेचे नवे दालन आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले दमदार पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत देशाने विकासाची नवी झेप घेतली आहे. ‘विकसित भारत 2047’ या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करत आहोत आणि महाराष्ट्र त्या प्रवासात अग्रस्थानी राहील, असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आज सुरू झालेले हे प्रकल्प म्हणजे या राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे आहेत. विमानतळ आणि मेट्रोच्या प्रकल्पांमुळे मुंबईकरांच्या जीवनमानात आणि महाराष्ट्राच्या प्रगतीच्या प्रवासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



*नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताच्या उड्डाणाला नवीन गती - केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री किंजरापु राममोहन नायडू*


 नवी मुंबई ही नवीन आशा आणि उत्साहाचे प्रतीक आहे. जागतिक दर्जाच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताच्या उड्डाणाला नवीन गती मिळाली आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी केले.



2014 नंतर मुंबई विमानतळावर प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या 190 वरून 260 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळ नव्या संधींचे दार उघडणार आहे. अंदाजे ₹100 अब्ज गुंतवणुकीत उभारण्यात आलेले हे विमानतळ 30,000 एकर क्षेत्रात पसरले असून सुमारे 2 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करेल. सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे हे एक आदर्श उदाहरण ठरेल, असे त्यांनी सांगितले.



सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा हवाई प्रवास उपलब्ध करून देऊ  - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ* 


देशातील सर्वोत्कृष्ट आणि कार्यक्षम विमान सेवा महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बहुप्रतिक्षित आणि महत्वाकांक्षी प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा हवाई प्रवास उपलब्ध करून देईल. अशा प्रकल्पांमुळे आगामी काळात सामान्य जनतेच्या हवाई प्रवासात मोठी वाढ होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नमूद केले.


केंद्र सरकारच्या ठोस धोरणांमुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होत असून, हे देशाच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...