पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी दसऱ्याचे सोने रूपी शालेय साहित्य वितरण;"प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली एकवटले पनवेल–उरण आणि खालापूरकर"
पनवेल : महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली , त्यांच्या आशा-स्वप्नं महापुरात वाहून गेले , तरीही शेतकरी थांबला नाही; तो पुन्हा शून्यातून नव्याने उभा राहतोय. अशावेळी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शक्य असेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजप नेते आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले होते. याप्रसंगी, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि पनवेल, उरण व खालापूरमधील नागरिक तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जमा करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा पुढाकार घेण्यात आला.
पनवेल उरण आणि खालापूर मधील विविध संस्थांनी व नागरिकांनी लहान मुलांसाठी दप्तर, वह्या, पेन्सिल, पेन, खोडरबर, शार्पनर, पट्टी यांसारखे शालेय साहित्य जमा केले. हे सर्व साहित्य दसऱ्याच्याच दिवशी वितरण करून लहान मुलांना दसऱ्याला सोनेरूपी शालेय वस्तूंची भेट द्यावी या श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या विचाराने दादांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील परांडे तालुक्यातील वागेगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दसऱ्याचे सोने रूपी शालेय संच वाटप करण्यात आले. याप्रसंगी लहान मुले आपल्या हातात पुस्तकं, वह्या आणि पेन्सिल धरताना अत्यंत आनंदी दिसत होती आणि त्यांच्या डोळ्यात उत्साह व आशेची चमक स्पष्ट दिसत होती. यावेळी परंडा तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक प्रतिनिधी, पालक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत परांडा तालुक्यातील १३८ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना पुढील आठवड्याभरात अशाच प्रकारे शालेय साहित्य वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील प्रत्येक लहान मुलाला शिक्षणासाठी आवश्यक शालेय वस्तू मिळतील.
दसऱ्याच्या दिवशीच हा उपक्रम घेऊन जेणेकरून लहान मुलं त्यांना आवश्यक ते नवीन शालेय साहित्य मिळाल्याने खुश होतील त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटेल हा उद्देश श्री.प्रितम म्हात्रे यांनी समोर ठेवून पूरग्रस्त लहान भावंडांना "सोने रुपी शालेय साहित्य" दिले, समाजाप्रती आजही त्यांची नाळ जोडलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
कोट:
"या प्रयत्नातून एक संदेश जातो की, जिथे सर्व नागरिक एकत्र येतात, तिथे कोणत्याही संकटाला आपण एकजुटीने सामोरे जाऊ शकतो. आपल्या लहान भावांना शिक्षणाची संधी मिळावी हीच खरी सेवा आणि समाजासाठी योगदान. या भावनेने आम्ही माझे बाबा श्री. जे एम म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो."
– श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे,
अध्यक्ष, जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था
Comments
Post a Comment