लोकनेते स्व. दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाणार; माननीय मुख्यमंत्री महोदयांचा स्पष्ट निर्वाळा!
मुंबई/प्रतिनिधी दि.३ : लोकनेते स्व. दि बा पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देणे, हा केवळ औपचारिकेचा विषय राहिला आहे. भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला कोणाचाही विरोध नसून, या नामकरणासाठी दुसरा कोणताही पर्याय शासनाकडे नाही, त्यामुळे आता विमानतळाचे नाव जाहिर होणे ही केवळ औपचारिकता राहिलेली आहे.८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी हे नामकरण होईल, याकरिता प्रयत्न केला जात असून, उद्घाटनानंतर किमान ४५ दिवसांचा कालावधी विमानतळ कार्यरत होण्यासाठी लागतो, अशावेळी या विमानतळाचे नामकरण हे नवी मुंबई विमानतळाचा नाम विस्तार आहे, त्यानंतर ‘लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असेच नामकरण होणार आहे.यासंदर्भात आमच्याकडून एकाच नावाचा प्रस्ताव गेलेला असून, आदरणीय पंतप्रधानांची मागील आठवड्यात भेट घेतली असता, त्यांनी सुद्धा राज्य सरकार जे नाव पाठवेल, तेच नाव अंतिम होईल, असा निर्वाळा दिल्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर बैठकीत सांगितले. यामुळे आमच्या मनात देखील लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव द्यायचे आहे, हा विश्वास ठेवावा.
नवी मुंबई विमानतळाप्रमाणेच पुणे येथील विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे नाव देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे.देशातील सर्व विमानतळांना नाव देण्यासंदर्भातील प्रक्रिया एका धोरणानुसार अंतिम केली जात असली तरी, लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबईतील विमानतळाला दिले जाईल असे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी असलेल्या मान्यवरांना सांगितले आहे.
Comments
Post a Comment