Skip to main content

लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचा वसा पुढे नेत विकासकामे चालूच राहतील – लोकनेते रामशेठ ठाकूर

 



पनवेल (प्रतिनिधी ) लोकनेते दि.बा. पाटील साहेबांनी दिलेला वासरा आपल्याला पुढे चालवायचा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजीनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले.



दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नागरीकांना भेडसवण्यासा समस्या मार्गी लावावल्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेत अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वनिधीतुन पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण, अंतर्गत आर.सी.सी. गटार आणि नविन पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. या सर्व कामांचे उद्घाटन आणि शिवाजीनगर गावाची बांधण्यात येणाऱ्या कमानीचे भुमीपूजन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. ०६) झाले.

          यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, लोकनेते दि. बा. पाटील आणि स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिलेल्या संस्कारातून आम्ही घडलो आणि मोठे झालो. त्यांनीच आम्हाला चांगले कार्य करण्याच्या सवयी लावल्या असल्याचे सांगून त्यांनी जे आंदोलनाचे बीज रोवले ते आम्ही अजूनही चालु ठेवलं आहे असे प्रतिपादन केले. तसेच ज्या प्रकारची विकासाची कामे आत्ता पर्यंत झाली तशीच कामे येणाऱ्या काळातही करत राहणार अशी ग्वाही दिली.

        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, गव्हाण परिसरामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेते या भुमीकेतून अनेक विकास कामे केली. जिथे सरकारचा निधी उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी पुढाकार घेऊन विभागाचा विकास केला. आपल्या परिसरामधील सर्व शाळा चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत त्याठिकाणी चांगले शिक्षण मिळाले पाहजे यासाठी आवश्यक ती ताकद लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लावली आहे. जे आपण करून ते चांगले आणि उत्तम झाले पाहिजे ही भावना त्यांनी ठेवली आहे. आणि हे करत असताना आपल्या गावचा विसर कधीही पडू दिला नाही त्यामुळे आपल्या परिसरामध्ये विकास कामे झाली पहिजे आपल्या परसिरातील समस्या मार्गी लागली पाहिजेत यासाठी सातत्याने ते दक्ष असतात, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व खूप मोठे असून आपण भाग्यवान आहोत की त्यांच्या सारखे नेतृत्व आपल्याला लाभले आहे, असे गौरवोद्गार काढले.

        या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठनेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, हेमंत ठाकूर, सचिन घरत, रतन भगत, विश्वनाथ कोळी, वसंतशेठ पाटील, जयवंत देशमुख, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, सागर ठाकूर, सी एल ठाकूर, सुधीर ठाकूर, मीनाक्षी पाटील, रमाकांत म्हात्रे, राजकिरण कोळी, नंदा ठाकूर, शशिकांत ठाकूर, सागर ठाकूर, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, नरेश मोकळ, गव्हाण ग्रामपंचायत प्रशासक महेश घबाडी, विजय कुमार राठोड, गजानन ठाकूर, विजय ठाकूर, सुजित ठाकूर, किशोर ठाकूर, धनंजय ठाकूर, किशोर पाटील, शनिदास ठाकूर, श्रीराम ठाकूर, शशिकांत ठाकूर, चिंतामण ठाकूर यांच्यासह पंच कमिटी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...