पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेला ना. मोहोळ यांचे ठोस आश्वासन प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा केंद्र सरकारकडून आदर होणार : ना.मोहोळ पनवेल / प्रतिनिधी - : पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या वतीने विमानतळाला दिबांच्या नावासाठी आज पुणे येथे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली असता ना. मोहोळ यांनी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे ठोस आश्वासन दिले. यावेळी ना. मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाच्या प्रस्तावाचा आधार घेत, दि. बां.च्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचेही सांगितले. रविवारी पुणे येथे ना. मुरलीधर मोहोळ यांची पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता त्यांनी पत्रकारांना आश्वासित केले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. तसेच यापुढेही मुंबई मंत्रालयावरील पायी मोर्चा, दिल्ली...