खारघर/प्रतिनिधी दि.२७-खारघर परिसरामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे प्रवेशमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सध्या हिरानंदानी फ्लायओव्हर व कोपरा फ्लायओव्हर हे दोनच प्रमुख मार्ग उपलब्ध असल्यामुळे या मार्गावर सतत मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करत असून, नेहमीच वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येते.
यावर तोडगा म्हणून स्थानिक नागरिकांनी सायन-पनवेल महामार्गावरील मेडीसिटी रुग्णालयासमोरून नवीन रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. हा रस्ता तयार झाल्यास खारघरमध्ये प्रवेशासाठी तीन प्रमुख मार्ग (हिरानंदानी, कोपरा व मेडीसिटी रस्ता) उपलब्ध होतील. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन खारघरकरांना दिलासा मिळेल.
ही मागणी गांभीर्याने विचारात घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने नवा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती भारतीय जनता पार्टी रायगड उत्तर जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदनाद्वारे आहे.
Comments
Post a Comment