उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सोमवारी (ता. २२) नवरात्रोत्सवानिमित्त वैष्णोदेवीचे पहिल्याच दिवशी दर्शन घेतले. सकाळी पहाटेच वैष्णोदेवीचे दर्शन झाल्याने त्यांना अत्यानंद झाला.
यावेळी ते म्हणाले, "वैष्णोदेवीचे शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी दर्शन घेण्याचा नित्यक्रम गेली २१ वर्षे अखंडपणे सुरू आहे. तो यापुढेही कायम राहील. देवीच्या दर्शनाने मला नवीन ऊर्जा मिळते. माझी अधिकाधिक भरभराट होते, हा माझा अनुभव आहे." दरम्यान, वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर महेंद्रशेठ घरत यांनी उरण, पनवेलमधील अनेक गावांत जाऊन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. अनेक नवरात्रोत्सव मंडळांना यावेळी त्यांनी यथोचित देणगीही दिली.
उरणमधील मा वैष्णो दरबार मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कालिकामाता आणि सरस्वती देवी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महिलांनी महेंद्रशेठ घरत यांचे आरती ओवाळून स्वागत केले.
Comments
Post a Comment