रायडर कामगारांवरील अन्यायकारक वागणुकीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची तीव्र भूमिका
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल येथील झेप्टो कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याबरोबर त्यांना न्यायिक सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ठाम ईशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेप्टो व्यवस्थापनाला दिला आहे.
अचानक आयडी रद्द करणे, विमा व अपघात संरक्षेचा अभाव, अन्यायकारक दंड आकारणी तसेच कामाच्या पद्धतीत मनमानी बदल या समस्या कामगारांना भेडसावत आहे. झेप्टो पनवेल न्यू स्टोअर येथे काम करणाऱ्या १५ रायडर कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपनी व्यवस्थापनाला पत्र देत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“क्विक-कॉमर्स क्षेत्राचा कणा हे रायडरच आहेत. मुंबईत याआधी स्विगी (२०२३ साली), ब्लिंकिट (२०२४ साली) व झोमॅटो (२०१९ साली ) यांच्या रायडर्सनी आंदोलन केलेले आहे. आता पनवेलमध्येही अशीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून आवाज उठविण्यात आले असून यावर झेप्टो व्यवस्थापनाने कामगारांसाठी सकारात्मक कार्यवाही न केल्यास रायडर व त्यांच्या कुटुंबांसह आंदोलन केले जाईल आणि स्टोअर बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेप्टो व्यवस्थापनाला दिला आहे.
Comments
Post a Comment