पनवेल महानगरपालिकेच्या खारघर प्रभाग सहा मधून शिवसेना (उबाठा) चे गुरुनाथ पाटील निवडणूक लढविण्यास इच्छूक
पनवेल दि.१९ (वार्ताहर) : जानेवारी २०२६ मध्ये होऊ घातलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीत खारघर प्रभाग क्रमांक सहामधून कर्तव्यदक्ष ज्याच्या रक्तातच समाजसेवेची नळ जोडली आहे असे शिवसेना (उबाठा) चे खारघर वसाहतीमधील शहर प्रमुख गुरुनाथ पाटील हे निवडणुक लढविणार असल्याची जोरदार चर्चा चर्चा सुरू आहे. त्यामुळे येथील जनतेत आनंदाचे वातावरण आहे. गुरुनाथ पाटील हे जनतेच्या सेवेतून उभारते नेतृत्व आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी युवा वयातच शिवसेनेशी नाल जोडली. आणि मग त्यातून जनतेची सेवा घडत गेली.
कोरोना काळात जेवढी मदत करता येईल तेवढी करता कोणीही उपाशीपोटी राहणार नाही याची काळजी घेतली. प्रभाग क्रमांक सहा मधील उद्याने किंवा परिसर साफ करताना त्यांनी पालिकेला धारेवर धरले आहे. आपल्या परिसरात पाणी टंचाई असेल तर टँकरने पाणी पुरवठा करत आले आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये एक, दोन ट्रान्सपोर्ट वाले राहत आहेत. या वाहतूकदारांना गुरुनाथ पाटील यांनी सहकार्य केले नाही असे होणार नाही. चोवीस तास सेवेत राहून वाहतूकदारांची कोणतीही समस्या असू त्यासाठी ते धावून येत आहेत. वीज, कचरा, धूर फवारणी यासारख्या सुविधाबाबत ते सदैव जनतेच्या सेवेत आहेत. त्यामुळे त्याचा दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील लोकांशी असलेली घनिष्ठ नाते यामुळे ते परिसरातील उदयन्मुख युवा नेतृत्व म्हणून गणले जातात. गुरुनाथ पाटील यांनी आपल्या कार्यातून प्रत्येक सोसायटीमध्ये विविध शिबिर भरून त्यांचे तपासणी करून त्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचे काम केले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेऊन कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवक निवडीने परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. आणि त्यांना निवडूण आणण्याची जबाबदारी येथील नागरिकच घेणार आहेत. याबदल तिळमात्र शंका नसल्याचे बोलले जात आहे.
Comments
Post a Comment