Skip to main content

Posts

Showing posts from June, 2025

लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया : आमदार प्रशांत ठाकूर

  पनवेल,दि.25 : लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया, लोकशाही जागृत ठेवण्याच्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करत राहूया, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.   केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आणीबाणी कालावधीत लोकशाहीचा लढा व बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 25 जुन रोजी आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यातआले यावेळी ते बोलत होते.पुढे ते म्हणाले,आणीबाणीच्या काळात लोकशाही पुर्नप्रस्थापित करण्यासाठी , त्यावेळी जे अन्याय अत्याचार सुरू होते, ते थांबविण्यासाठी ज्यांनी सक्रिय भूमिका बजावली अशा मान्यवरांच्या कर्तृत्वाचा अभिमान पनवेलकरांना आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.       या कार्यक्रमास महापालिका कार्यक्षेत्रातील आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यांमध्ये बंदिवास भोगावा लागलेले 7 मान्यवर,आमदार प्रशांत ठाकूर, मनपा आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे ,उपायुक्त सर...

खारघर वाहतूक पोलिस शाखेचा अनोखा उपक्रम

  वाहन चालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा उपलब्ध पनवेल प्रतिनिधी :  वाहन चालकाने नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्यांना ऑनलाईन दंड आकारला जातो. तो आकारलेला दंड भरायचा कुठे माहिती नसल्यामुळे वाहन चालक चालकांचा वेळ वाया जात  होता ही बाब लक्षात घेऊन           खारघर उड्डाणपुला खालील  मंकी पॉईंट येथील वाहतूक चौकी येथे वाहनचालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा  खारघर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी वाहन चालक आपल्याविरोधातील प्रलंबित दंड तपासू शकतात तसेच तिथेच दंडाची रक्कम भरू शकतात.          वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वाहनचालकांना पोलीस ठाणे किंवा इतर कार्यालयात जावे न लागता थेट चौकीवरच आवश्यक ती कारवाई पूर्ण करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त वाढण्यास मदत होईल या राबवत असलेल्या मोहिमेचे वाहन चालकांनी खारघर वाहतूक शाखेचे कौतुक केले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे

 सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद  मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.            या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेत...

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास कटिबद्ध - माजी सभागृहनेते परेश ठाकूर

  पनवेल (प्रतिनिधी) घोटगावाला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तसेच परीरातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरीकांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भाजप काम करेल अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी घोट येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले.        दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत भाजपचे युवानेते नितेश पाटील यांच्यावतीने घोट गावातील नागरीकांना मोफत छत्री आणि परिसरातील सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच यावेळी घोट गावाजवळ सुमारे १२ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन, १२ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीमधून साकारण्यात येणाऱ्या कोयनावेळे ते आरटीओ पर्यत्ताच्या रस्त्याच्या डांबीकरणाच्या कामाचे आणि सुमारे ९ कोटी ५ लाख रुपयांच्या निधीमधून बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमी भूमिपू...

महेंद्रशेठ घरत यांच्याकडे संपूर्ण कोकणाची जबाबदारी सोपवा;जिल्ह्यातील काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठकीत मागणी

  शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न उरण दि १९(प्रतिनिधी)-"महेंद्रशेठ घरत हे काॅंग्रेसचे निष्ठावंत जिल्हाध्यक्ष आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतात. त्यांच्याकडे दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व हे सर्वच गुण आहेत. साम, दाम, दंड भेद या नीतीचा वापर करण्यात ते वाकबगार आहेत. त्यामुळे कोकणाची संपूर्ण जबाबदारी महेंद्रशेठ घरत यांच्याकडेच द्या," अशी रायगड जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या सर्वच पदाधिकारी यांनी पनवेल तालुक्यातील शेलघर येथे गुरुवारी (ता. १९) मागणी केली. "काॅंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. जे लोक काॅंग्रेसला सोडून गेलेत, ते स्वार्थी होते. रायगडमध्ये नव्याने काॅंग्रेस पक्ष उभा करायचा आहे. त्यासाठी येथील काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या जातील. महेंद्रशेठ घरत यांच्यावर लवकरच योग्य जबाबदारी सोपविण्यात येईल," असे काॅंग्रेसचे कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. व्यंकटेश हे शेलघर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव, कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. व्यंकटेश, महाराष्ट्र प्रदेश काँ...

भाजपची कोकण विभागीय आढावा बैठक संपन्न

  पनवेल (प्रतिनिधी) गेल्या ११ वर्षांतील मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने भक्कम पावले टाकली आहेत. 'संकल्प से सिद्धि तक' या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित, केंद्र सरकारच्या यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प भाजपा महाराष्ट्र प्रदेशने हाती घेतला आहे. या अभियानाच्या अनुषंगाने ठाणे-कोकण विभागीय आढावा बैठक प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात संपन्न झाली. या बैठकीत कोकणातील संघटनात्मक बांधणी, बूथ पातळीवरील व्यवस्थापन तसेच लोकांपर्यंत प्रभावीपणे संवाद साधण्याच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली.  कमळ हे केवळ चिन्ह नसून, भाजपाच्या विचारसरणीचे प्रतीक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या वेशात कमळ परिधान करून अभिमानाने भाजपा प्रतिनिधित्व करावे. आणि मोदी सरकारच्या विकासकार्यांचा घरोघरी प्रचार करणे ही काळाची गरज आहे आणि हे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचे दायित्व समजून पार पाडावे अशा सूचना उपस्थितांना करण्यात आली. हे अभियान म्हणजे केवळ ...

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात

  १६ शाळांमधील सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग  पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्व कौशल्य आणि नेतृत्वगुणांची जोपासना व्हावी या हेतूने ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ २३ जूनपासून भव्य स्वरूपात सुरू होणार आहे. कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित केली आहे. यावर्षी स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरले आहे.              हि स्पर्धा वर्ग अंतर्गत फेरी, शाळा अंतर्गत फेरी आणि शालेय अंतिम फेरी होणार असून निवडक ६०० स्पर्धकांमधून अंतिम ६० विजेते ठरणार आहेत. मागील वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही तितक्याच उत्साहात स्पर्धा पार पडणार आहे. १६ शाळांमधून सुमारे १३ हजार विद्यार्थी सहभाग घेणार आहेत आणि त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल कामोठे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे, चांगू काना ठाकूर विद्यालय (इंग...

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम

  पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार, समाजसेवक, व दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ७५ व्या वर्षात प्रवेश केला असून त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रम आज (दि. १८) पार पडला. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढवणे आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला.          महाराष्ट्र राज्य पर्यावरण संरक्षण संस्थेचे माजी निरीक्षक तसेच पनवेल तालुका कुंभार समाज अध्यक्ष बजरंग भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव कावडे, सामाजिक कार्यकर्ते महेश ठोकळ, शिक्षिका महाले मॅडम व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. कार्यक्रमात चिकू, आंबा यांसारख्या कलमी फळझाडांची वृक्षलागवड करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम जागृत व्हावे यासाठी त्यांना झाडांचे वाटप करण्यात आले. लहानग्यांच्या हातून रोपांची लागवड करून "एक झाड, एक जीवन" हा संदेश देण्यात आला. पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करत सहभागी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढ...

मोदी सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहचवा -आमदार प्रशांत ठाकूर

  पनवेल (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या अकरा वर्षाच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. गोरगरिबांसाठी विविध योजनांच्या माध्यमातूनही मोदी सरकारने काम केले. हे काम आपण लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते खारघरमधील रामशेठ ठाकूर कॉलेज येथे आयोजित संकल्प से सिद्धी या कार्यशाळेत बोलत होते. केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील पनवेल तालुका उत्तर मंडळाच्या वतीने संकल्प सिद्धी या कार्यशाळेचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातांमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.           या कार्यशाळेला भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, पनवेल तालुका उत्तर मंडळाचे संपर्कप्रमुख राजेश भगत, अध्यक्ष दिनेश खानावकर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरिश केणी, पापा पटेल, मन्सूर पटेल, माजी नगरसेविका मंजुळा कातकरी, महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे, ...

आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा रायगड जिल्हा दौरा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे सचिव तथा कोकण विभागाचे प्रभारी मा.श्री. यू.बी. व्यंकटेशजी हे गुरुवार दि. १९ जून २०२५ रोजी प्रथमच रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचात निवडणुकां संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यांचे समवेत मा. राजेश शर्मा (निरीक्षक रायगड तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) मा. राणीताई अग्रवाल मॅडम, (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तथा सहप्रभारी रायगड), मा. श्री श्रीरंग बर्गे, (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तथा सहप्रभारी रायगड) हे उपस्थित राहणार असून त्या साठी गुरुवार दि. १९ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जोमा नारायण घरत समाजमंदिर शेलघर येथे जिल्हा काँग्रेस कमिटी ची अत्यंत महत्वाची बैठक बोलविण्यात आली असून ब्लॉक / शहर अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक पदाधिकारी, फ्रंटल ऑर्गनायझेशन पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांचे आजी/ माजी सदस्य, रायगड जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी तसेच इतर सर्व पदाधिकारी व कार्य...

मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद

  पनवेल, दि.17 (संजय कदम) ः पनवेल परिसरासह खांदेश्‍वर परिसरात मोटार सायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना खांदेश्‍वर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.परिमंडळ 2 मधील नवीन पनवेल, पनवेल या भागांमधुन मागील बर्‍याच दिवसांपासुन मोटार सायकल व जबरीने सोन्याच्या चेन चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. मोटारवाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अति. पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-2 प्रशांत मोहीते, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, अशोक राजपुत यांनी वारंवार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मिटींग घेवुन मोटारवाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिलेल्या होत्या. खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती स्मिता ढाकणे, पोनि (गुन्हे) सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सपोनि शरद बरकडे व ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत राजकारण्यांचे गौडबंगाल काय ?-महेंद्रशेठ घरत

उरण (प्रतिनिधी) -"देवाचे कार्य म्हणजे आपले कार्य, कर्ता करविता तोच आहे, तोच मालक आपल्या यशाचा, आपण तर रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हातानेच जाणार आहोत. देवाच्या कामासाठी कधीही मागेपुढे पाहणार नाही. जावळे, शेलघर ही दोन्ही गावे दिवंगत भगत साहेबांपासून आम्ही एकच समजतो. जावळे गावातील विद्यार्थी १९७०-१९८० पर्यंत शेलघरच्या जिल्हा परिषद शाळेत येत होते. ते सारे आमचे वर्ग मित्र होते. त्यामुळे निश्चित इतर गावांपेक्षा जावळे ग्रामस्थांबाबत जास्त आत्मियता आहे. त्यामुळे जावळे ग्रामस्थांसाठी मी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो. जावळे गावाला मैदान, तलाव, समाज मंदिर आदी नागरी कामांसाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. कोणीही आमदार, खासदार असला तरी ते निवडणुकीपुरते असतात.फक्त मतांसाठी असतात.दि. बा. पाटील यांच्यानंतर प्रकल्पग्रस्तांना आधार राहिलेला नाही, म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणून सदैव प्रयत्नशील असतो. दि. बा. पाटील यांचा संघर्ष जिवंत असेपर्यंत संपला नव्हता, आज विमान उडण्याची वेळ आली तरी त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही, हे राजकारण्यांचे काय गौडबंगाल आहे. अद्याप नावाची घोष...

नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप कटिबद्ध -माजी सभागृहनेेते परेश ठाकूर

पनवेल(प्रतिनिधी) पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून नवीन पनवेलमध्ये उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.             पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा विकासनिधी आणि महापालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर 16, प्लॉट नंबर 3 येथील गार्डनमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यात आले आहे. माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून 19 लाख 11 हजार रुपये खर्चाचे हे काम पूर्ण झाले आहे. या सभागृहाचे उद्घाटन माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, अजय बहिरा, सुनील बहिरा, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, प्रिती जॉर्ज, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, अर्चित घ...

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खारघर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रम

  पनवेल(प्रतिनिधी) गोरगरिबांचे कैवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खारघर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आणि खारघरचा राजा मंडळाच्या वतीने खारघर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून साहित्याचे वाटप केले आणि कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी नुकतीच वयाची वर्षे पूर्ण केली असून, त्यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने खारघर शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले, तर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, खारघरचा राजा मंडळाचे संस्थाप...

कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त परिवाराची कार्यकारिणी जाहीर

  पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाचगाव कदम ग्रामस्थ एकत्र आले आहेत. गावातील ग्रामस्थांच्या उद्भवणार्‍या समस्या शासन दरबारी सोडवण्याकरिता वेळे, करंजवडे, जांब्रुक, रोहिणे, भवानी नगर या पाचगावातील नागरिकांनी एकत्र येत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवार या संघटनेची स्थापना करून कार्यकारिणीची निवड केली.  ठाणे विश्रामगृह येथील बैठकीत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवाराच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष मुकुंद कदम (वेळे), उपाध्यक्ष संजय कदम (भवानी नगर), सचिव सदानंद कदम (जांब्रुक) वांवढळ, खजिनदार अमोल कदम (करंजवडे/भिवंडी), सहसचिव सूर्यकांत कदम (रोहिणे/आनगाव), सहखजिनदार मंदार कदम (वेळे), तसेच कार्यकारिणी सदस्यपदी सुनील कदम (वेळे), प्रमोद पवार (भवानी नगर), संतोष कदम (जांब्रुक/वावंढळ), बाळकृष्ण कदम (रोहिणे/आनगाव), अनंत कदम (रोहिणे /माणगाव), भगवान कदम (रोहिणे/माणगाव), सुभाष कदम (धरणा कॅम्प), निलेश कदम (वेळे), दिलीप कदम (रोहिणे), सल्लागारपदी धनंजय कदम (वेळे), शशिकांत कदम (वेळे), आनंद कदम (करंजवडे/भिवंडी), निलेश कद...

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पनवेल एमकेसीएलच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिर

  पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ(एमकेसीएल) पनवेल यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'भरारी २०२५' हे करिअर विषयक मोफत मार्गदर्शन शिबीर पनवेल येथे आज (दि. १०) आयोजित करण्यात आले.        पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या शिबिराचे उदघाटन प्रमुख मान्यवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला एमकेसीएलचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल भगत, पुणे एमकेसीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक नटराज कटकधोंड, स्वाती जयंत भगत, एमएसआयसीटीचे विविध विभागातील अधिकृत केंद्रप्रमुख तसेच विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतःच्या संघर्षमय कारकिर्दीची गाथा विद्यार्थ्या...

लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला - आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल (हरेश साठे) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला आहे. त्यामुळे देशाने ‘विकसित भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘संकल्प से सिद्धी’ या मंत्रांचा अंगीकार करत ऐतिहासिक परिवर्तनाचा काळ अनुभवला आहे. हा कार्यकाळ भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. १२ ) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ११ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आणि त्या अनुषंगाने सरकारने देशवासियांसाठी केलेले योजना, निर्णय, उपक्रमांची माहिती देण्यासाठी पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, पनवेल पूर्व मंडल ...

नवी मुंबईतील सर्वच विभागांत व्यापक लोकसहभातून वृक्षारोपण मोहीम – वृक्षसंवर्धनाचे आवाहन

       नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात व व्यापक लोकसहभागातून भव्यतम वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.             महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपणाप्रसंगी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, बचत गटांच्या महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या सक्रिय सहभागातून प्राधान्याने देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.             सीबीडी बेलापूर मधील पारसिक हिल येथे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरंगी, चिंच, आवळा, जांभूळ, हादगा, बांबू अशा देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास आगाखान एजन्सी फोर हॅबिटॅट इंडिया, जन स्मॉल फायनान्स बॅंक, रोटरी क्लब, महिला बचत गट,केबीपी कॉलेज वाशी, एस के क...

पनवेल तालुक्यातील गाढेश्‍वर,देहरंग,मोरबे धरणासह इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी..

  पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेश्‍वर, देहरंग, मोरबे ही धरणे तसेच वारदोली धबधबा, कुंडी धबधबा, हरीग्राम नदीपात्र, धोदाणी, चिंध्रण, महोदर, शांतीवन नदीपात्र, माची प्रबख व खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदई, नेवाळी धबधबा, गाढी नदीपात्र अशा ठिकाणी पावसाळी पर्यटन स्थळे आहेत. सदर ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशेष शाखा रश्मी नांदेडकर यांनी विशेष आदेशान्वये केली आहे. सदर परिसरामध्ये पावसाळ्यात दर शनिवार व रविवार या दिवशी सुमारे 300 ते 400 व गाढेश्‍वर धरण परिसरात सुमारे 4000 ते 5000 तरुण-तरुणी कुटुंबांसह व मित्रांसह फिरण्यास येतात. परंतु अनेक पर्यटक हे दारु प्यायलेले असतात. ते धरणातून येणार्‍या नदी नाल्याच्या पाण्यात उतरतात. अनेकांना येथील पाण्याचा अंदाज नसल्याने पर्यटक गाफील असतात व अचानक पाण्याचा लोंढा वाढून त्यात ते पर्यटक वाहून जावून बुडून मृत्यू होतात. या अनेक घटना पनवेल तालुका पोलीस ठाणे तसेच खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असल्याने सदर ठिकाणी यावर्षी सुद्धा पावसाळी पर्यटन स्थळांचे ठिकाणी ...

नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ;लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नीक घेतला नाटकाचा आनंद

  पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय नाट्य महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' आणि 'कुटुंब किर्रतन' या सुप्रसिद्ध अशा दोन विनोदी नाटकांची पर्वणी नाट्य रसिकांना मिळाली होती, आणि हे दोन्ही प्रयोग हाऊसफुल झाले होते.         पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेते प्रशांत दामले, तसेच कविता मेडेकर अतुल तोडणकर यांची प्रमुख भूमिका असलेले 'एका लग्नाची पुढची गोष्ट' तर सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी आणि वंदना गुप्ते यांची भूमिका असलेले 'कुटुंब किर्रतन' या नाटकांचे सादरीकरण झाले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर यांनीही या नाटकांचा आस्वाद घेतला. दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर व रंगकर्मी प्रशांत दामले यांची नाट्य ...

राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना महेंद्रशेठ घरत यांचा मदतीचा हात;महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते बॅडमिंटनपटूंचा सन्मान

  उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) "रामशेठ ठाकूर स्पोर्टस काॅम्प्लेक्सला भूखंड मिळवण्यासाठी आणि अत्याधुनिक स्पोर्टस काॅम्प्लेक्स उभारण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यासाठी देशातील-परदेशातील बहुसंख्य स्टेडियमची पाहणी त्यांनी केली. यात माझा खारीचा वाटा आहे. रामशेठ ठाकूर स्पोर्टस काॅम्प्लेक्स उभारणी करताना रामशेठ ठाकूर यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. त्यातूनच आजचे भव्यदिव्य रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस काॅम्प्लेक्स साकार झाले आहे. येथे खेळत असलेले खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतात, त्यामुळे त्याचा मलाही अभिमान आहे. त्यामुळेच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बॅडमिंटनपटूंना गौरविण्यात येत आहे, ही माझ्यासाठी अत्यानंदाची गोष्ट आहे." असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले. महेंद्रशेठ घरत यांनी राष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या बॅडमिंटनपटूंना अडीच लाखांची प्रोत्साहनपर मदत केली. खेळाडूंना ते नेहमीच मदत करतात. योनेक्स-सनराईज रामशेठ ठाकूर रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी घेण्यात आली. रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि रामशेठ ठाक...

महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने उत्साहात साजरा.;मान्यवरांच्या हस्ते `सुखकर्ता’ विशेष अंकांचे प्रकाशन

  उरण दि २(विठ्ठल ममताबादे )आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा ५८ वा वाढदिवस गुणवंतांच्या साक्षीने व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्या जीवनकार्यावर आधारित `सुखकर्ता’ हा छोटेखानी विशेषांक प्रकाशित करण्यात आला. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील हजारो मान्यवर महेंद्रशेठ घरत यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, दिबांचे पुत्र अतुल पाटील, पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश ठाकूर, ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी,उद्योजक राम म्हात्रे, उद्योजक सुनील म्हसकर, डॉ. दिपाली गोडघाटे, ॲड. रेखा चिरनेरकर, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे, तसेच एम. जी. ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांचा सपत्निक सत्कार केला.

द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामिश्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाला दिले आशीर्वाद

    पनवेल (हरेश साठे) दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करत ७५ व्या वर्षात अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या विशेष प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, साहित्य, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामिश्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दिले. यावेळी अनेक मान्यवरांनी “लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजाचा वाढदिवस” असे गौरवोद्गार काढले.    लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण आहे. राजकीय व आर्थिक शक्ती लोक कल्याणासाठी सार्थकी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख नेहमीच अधोरेखित झाली असून त्यांचा माणसा...

साहित्यिकांचा मी कृतार्थ आहे - लोकनेते रामशेठ ठाकूर

  कोमसापतर्फे कवी संमेलन, परिसंवाद,सन्मान पुरस्कार, अभिष्टचिंतन सोहळा संपन्न  पनवेल(प्रतिनिधी) माझ्या आयुष्यात मला साहित्य रूपाने साहित्यिकांनी भरभरून दिले आहे,त्यामुळे खरोखरच मी त्यांचा कृतार्थ आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक कृतार्थ संध्याकाळ' या साहित्यिक कार्यक्रमात केले. या साहित्यिक कार्यक्रमात कोमसापतर्फे कवी संमेलन, लोकनेते रामशेठ ठाकूर एक बहुआयामी व्यक्तिमत्व परिसंवाद, सन्मान गौरव, अभिष्टचिंतन संपन्न झाला.          या साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक,कवी,चित्रपट निर्माते,दिग्दर्शक रामदास फुटाणे, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, ...

लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण- भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल (हरेश साठे) लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. लोकांच्या दुःखात सहभागी होण्याबरोबरच आपल्या वैभवाचा उपयोग त्यांनी समाजकल्याणासाठी केला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खांदा कॉलनी येथे 'अमृतमयी कीर्तन' महोत्सवात केले.          सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात संतांच्या वाणीच्या गोडव्याने अर्थात 'अमृतमयी कीर्तन महोत्सव २०२५' ने झाली असून त्यानिमित्त आदरणीय गुरुतुल्य कीर्तनकार महाराजांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.           या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे...

उलवे नोडमध्ये रयत शिक्षण संस्थेचे सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालय-विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

 रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभली उपस्थिती  पनवेल (हरेश साठे) उलवे पुष्पक नोडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची उभारणी करण्यात येत असून, या विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज (०१ जून )संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांची पत्नी शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते.  सेक्टर २४ मधील प्लॉट क्रमांक २४० येथे झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी स...

लोकनेते रामशेठ ठाकूर ०२ जूनला करणार अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण

  पनवेल (प्रतिनिधी ) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमे आयोजित करण्यात आले आहे. अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात संतांच्या वाणीच्या गोडव्याने अर्थात 'अमृतमयी कीर्तन महोत्सव २०२५' ने झाली असून ०२ जून रोजी वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा या कीर्तन महोत्सवात होणार आहे.  दानशूर, समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'कीर्तन महोत्सवा'ला हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात व भक्तीमय वातावरणात खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य प्रारंभ झाला. दोन दिवसात या महोत्सवाला पनवेल, उरण, कर्जत, खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. संत परंपरेचा महिमा ...