पनवेल (प्रतिनिधी ) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमे आयोजित करण्यात आले आहे. अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात संतांच्या वाणीच्या गोडव्याने अर्थात 'अमृतमयी कीर्तन महोत्सव २०२५' ने झाली असून ०२ जून रोजी वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा या कीर्तन महोत्सवात होणार आहे.
दानशूर, समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'कीर्तन महोत्सवा'ला हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात व भक्तीमय वातावरणात खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य प्रारंभ झाला. दोन दिवसात या महोत्सवाला पनवेल, उरण, कर्जत, खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. संत परंपरेचा महिमा आणि अध्यात्मिक वारसा जपणाऱ्या या महोत्सवात नामवंत भजन गायक यांचे संगीत भजन व कीर्तनकारांचे कीर्तन झाले. तसेच या दोन दिवसात ९२ हरिपाठ मंडळांचे सामुदायिक हरिपाठ तसेच १०१ आदरणीय गुरुतुल्य कीर्तनकार महाराजांचा सत्कार संपन्न झाला. सोमवार दिनांक ०२ जून रोजी दुपारी नाद ब्रह्म साधना भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ०४ वाजता ४६ हरिपाठ मंडळांचे सामुदायिक हरिपाठ, सायंकाळी ५. ३० वाजता आदरणीय गुरुतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा होणार असून सायंकाळी ०७ वाजता ह. भ. प. विश्वनाथ महाराज वारिंगे (अंबरनाथ) यांचे हरिकीर्तन होणार आहे. तसेच लोकमान्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळाही या ठिकाणी होणार आहे
Comments
Post a Comment