पनवेल : आजही मी शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट मत मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. गेली 48 वर्षे मी राजकारणात असून शेकापक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. पक्षाने जी-जी जबाबदारी माझ्या टाकली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे, असे असतानाही नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उरण मतदार संघातून माझा मुलगा प्रितम म्हात्रे हा उभा असताना त्याच्या विरोधात महाविकास आघाडीने काम केले अहे. त्यामुळे निसटता पराभव आमचा झाला. याबाबत मी माझी स्पष्ट भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडून आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू या असे वारंवार सांगितले. परंतु त्यांना आजही महाविकास आघाडीमध्येच रहायचे असल्याने मी या महाविकास आघाडीतून माझ्या कार्यकर्त्यांसह बाहेर पडत आहे. भाई जयंत पाटील यांच्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला. पनवेल मतदार संघातून ब...