Skip to main content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारपासून पनवेलमध्ये भव्य 'कीर्तन महोत्सव'

 



पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने दिनांक ३१ मे ते ०२ जून पर्यंत खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने तीन दिवस भव्य स्वरूपात 'कीर्तन महोत्सव' होणार आहे. 
          लोकनेते रामशेठ ठाकूर दानशूर व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात ओळखले जातात. त्यांचे सर्व क्षेत्रातील योगदान नेहमीच आदर्शवत राहिले आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन व अर्थसहाय्य केले आहे, त्याचबरीबरीने अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य मोलाचे आहे, मंदिरे बांधणे, मंदिराचे जिर्णोद्धार तसेच दिंडीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हस्ते मदत केली आहे, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा अध्यात्मिक सोहळा मोठ्या प्रमाणात उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे, यासाठी वारकरी संप्रदायातील व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.
          "दानशूरता, समाजसेवा आणि अष्टपैलू कर्तृत्व यांच्या अद्वितीय संगमामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखं व्यक्तिमत्व संपूर्ण जिल्ह्यात दुर्मिळच आहे. त्यामुळे त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष संपूर्ण वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्याचा निर्णय लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीने घेतला आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पण निमित्त अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला अशा क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्यात येणार असून कीर्तन महोत्सव हा पहिला अध्यात्मिक कार्यक्रम असणार आहे. यामध्ये संगीत भजन, हरिपाठ, हरी कीर्तन आणि अध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी तीन दिवस कीर्तन साथकरी म्हणून पनवेल, उरण, खालापूर परिसरातील समस्त वारकरी संप्रदायातील गुणीजन मंडळांची साथ लाभणार आहे.
         शनिवार दिनांक ३१ मे रोजी दुपारी २ वाजता या महोत्सवाची सुरुवात प्रतिमा पूजनाने आणि दुपारी ०३ वाजता रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांच्या भजनाने होणार आहे. सायंकाळी ०४ वाजता ५० हरिपाठ मंडळांचे सामुदायिक हरिपाठ, त्यानंतर सायंकाळी ५. ३० वाजता आदरणीय गुरुतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा, सायंकाळी ०७ वाजता ह.भ. प. उमेश महाराज दशरथे (परभणी) यांचे हरिकीर्तन त्यानंतर रात्री ०९ वाजता महाप्रसाद होणार आहे. रविवार दिनांक ०१ जून रोजी दुपारी २. ३० वाजता शिवशंभो प्रासादिक मंडळ (चिंचिवली गोहे) यांचे भजन, सायंकाळी ०४ वाजता ४५ हरिपाठ मंडळांचे सामुदायिक हरिपाठ, सायंकाळी ५. ३० वाजता आदरणीय गुरुतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा, सायंकाळी ०७ वाजता संत माणकोजी महाराज बोधले यांचे ११ वे वंशज ह. भ. प. ऍड. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर) यांचे हरिकीर्तन, रात्री ०९ वाजता महाप्रसाद तर सोमवार दिनांक ०२ जून रोजी दुपारी २. ३० वाजता नाद ब्रह्म साधना भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ०४ वाजता ४६ हरिपाठ मंडळांचे सामुदायिक हरिपाठ, सायंकाळी ५. ३० वाजता आदरणीय गुरुतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा, सायंकाळी ०७ वाजता ह. भ. प. विश्वनाथ महाराज वारिंगे (अंबरनाथ) यांचे हरिकीर्तन आणि  वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि रात्री ०९ वाजता महाप्रसाद होणार आहे, अशी माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...