Skip to main content

खारघर सेक्टर १४ मधील कब्रस्तानाच्या जागेवरील अनधिकृत वापरावर तातडीची कारवाई करावी – आमदार प्रशांत ठाकूर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

 

पनवेल(प्रतिनिधी) खारघर मधील सेक्टर १४ येथील कब्रस्तानासाठी सिडकोने दिलेल्या जागेचा वापर अवैधपणे मशिद व अन्य धार्मिक कार्यक्रमाकरिता करण्याबरोबरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्याकडे केली. 

          सिडकोने कब्रस्तानासाठी दिलेल्या जागेचा हेतुपुरस्सर अनधिकृतरीत्या मशिद व धार्मिक कार्यक्रमांसाठी वापर केला जात असल्याच्या गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिष्टमंडळासह भेट घेत या गंभीर विषयावर पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांचे लक्ष वेधले. या शिष्टमंडळात त्यांच्यासोबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा मोर्चा खारघर अध्यक्ष नितेश पाटील, विश्व हिंदू परिषदेच्या प्रसन्ना धर्माधिकारी, क्रिश्ना बांदेकर, हिंदू जागरण मंचचे शिवम सिंग, अॅड. गायत्री खडवडकर, आदित्य कांबळे, शैलेंद्र त्रिपाठी आदींचा समावेश होता. 

          या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलीस आयुक्तांना निवेदनही दिले. या निवेदनातून विषयाचे गांभीर्य त्यांनी अधोरेखित केले. खारघर सेक्टर १४ येथील जागा सिडकोने कब्रस्तास्तानाकरिता राखीव ठेवली असतानासुद्धा सदर जागेचा वापर हा हेतुपुरस्सररित्या मशीद महणून केला जात असून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नमाज पठण व इतर धार्मिक कार्यक्रमाचे नियमितपणे आयोजन होत असल्याचे निदर्शनात आले असून हे अत्यंत चुकीचे व संतापजनक आहे. या प्रकारांमुळे सदर परिसरातील सामाजिक सलोखा धोक्यात आला असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या परिसरात मुस्लीम समाजाची लोकवस्ती नसतानादेखील मुद्दामून हेतुपूर्वक या सर्व गोष्टी केल्या जात आहेत.

जाणीवपूर्वक मुस्लीम समाजातर्फे या कब्रस्तानच्या जागेचे कब्रस्तान मशीद असे संबोधन केले जाते व याठिकाणी नमाज पठणाकरीता तसेच धार्मिक कार्यक्रमाकरीता त्या समाजातील लोकांना बोलावले जात असल्याचे लक्षात आले आहे. तसेच या भूखंडावर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता मोठयाप्रमाणात नमाजाकरीता सभागृह तसेच स्वच्छतागृह बांधण्यात आलेली असून त्याकरीता प्रचंड खर्च करून ग्रॅनाईट व मार्बलचा वापर केला आहे. एवढे सगळे अनधिकृत बांधकाम होत असताना सिडको प्रशासन व पोलीस प्रशासन यापैकी कुणालाही याबाबत अजिबात काही माहिती मिळत नाही व त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही हे आश्चर्यकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

          तसेच मध्यंतरी याच खारघर परिसरात या समाजाच्या इज्तिमा कार्यक्रमानंतर एक हिंदू बांधवाला जीवे मारण्याचा अनुचित प्रकार घडले आहे. त्यानंतर या परिसरांत प्रचंड तणाव निर्माण झाला होता व सामाजिक परिस्थिती पूर्णपणे विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे दोन्ही समाजांत प्रचंड तेढ निर्माण झाली होती व दंगलसदृष्य परिस्थिती झाली होती. त्यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना अथक परिश्रम घ्यावे लागले होते. अशातच आता सेक्टर १४ मधील कब्रस्तानच्या जागेचा अवैधरित्या मशिद व धार्मिक कार्याकरीता जो विनदिक्कत वापर होत आहे त्याबद्दल अन्य समाजात प्रचंड राग आहे व त्यासंदर्भात तेथील स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासनामार्फत अद्यापही कोणतीच कारवाई केली जात नाही, हे खेदजनक आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे अजुनही दिरंगाई झाली तर त्या ठिकाणी दोन्ही समाजांमध्ये काहीतरी अनुचित प्रकार होऊन सार्वजनिक शांतता बिघडण्याची व कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. वारंवार तक्रारी करूनही कब्रस्तानसाठी दिलेल्या जागेवर खारघरचे रहिवासी नसलेल्या लोकांकडून नमाज पठण केले जाते व त्याच माध्यमातून एका समाजाला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न करणे हे प्रकार थांबविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करून कब्रस्तानाचे अवैधरित्या मशिदीत रूपांतर करणाऱ्या संबंधित ट्रस्टींवर व त्यांना पाठबळ देणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्याकडे केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...