पनवेल (प्रतिनिधी ) दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ०२ जून रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष “रक्तदान उपक्रम” सुरु करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांसाठी आणि इतर गरजू रुग्णांसाठी या रक्तदान उपक्रमाचे मोठे योगदान ठरणार आहे.
भव्य रक्तदान शिबिर हा कार्यक्रम केवळ सामाजिक भानातून नव्हे तर एक प्रकारचा मानवतेचा महोत्सव म्हणून साजरा होत आहे. माननीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजसेवा, आरोग्य व जनकल्याणाचे कार्य आपल्या राजकीय जीवनात सातत्याने केले आहे आणि त्याच परंपरेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि रक्तदानासाठी विशेष मेहनत घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने रविवार दिनांक ०१ जून रोजी या उपक्रमाला नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment