पनवेल मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम : ४ हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई व घरघंटी मशीन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी स्वयंरोजगार उपक्रम पनवेल (प्रतिनिधी) पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या ४ हजारहून अधिक पात्र लाभार्थींना सोमवार दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी पासून शिलाई व घरघंटी मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम पनवेल मतदारसंघात घरगुती उद्योगांना नवी दिशा प्रदान करणारा ठरणार आहे. महिलांच्या हाती रोजगाराचे साधन दिल्यास त्यांच्या कुटुंबाच्या उन्न...