पनवेल दि .१५ (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिन समितीवर शासकीय तालुकास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा मा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल, पनवेल शाखा आयोजित साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन चे आयोजन पनवेल येथे करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान सोहळ्याचे अध्यक्ष मा रामशेठ ठाकूर साहेब,प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए के शेख, नवीन पनवेल शाखा अध्यक्ष गणेश कोळी, पनवेल शाखा अध्यक्ष सुभाष कुडके, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी उपमहापौर चारुशीला घरत आदींच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते नुकतीच महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिन समितीवर शासकीय तालुकास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Comments
Post a Comment