पनवेल दि .१५ (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिन समितीवर शासकीय तालुकास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा मा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल, पनवेल शाखा आयोजित साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कविसंमेलन चे आयोजन पनवेल येथे करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान सोहळ्याचे अध्यक्ष मा रामशेठ ठाकूर साहेब,प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए के शेख, नवीन पनवेल शाखा अध्यक्ष गणेश कोळी, पनवेल शाखा अध्यक्ष सुभाष कुडके, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी उपमहापौर चारुशीला घरत आदींच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते नुकतीच महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिन समितीवर शासकीय तालुकास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
मुंबई/प्रतिनिधी,दि.१५-राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका अशा सर्वच निवडणुका टप्प्याटप्प्याने आता घेतल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती आता घोषित केली आहे. या महत्त्वपूर्ण महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये आमदार विक्रांत पाटील यांना निवडणूक 'राज्य निवडणूक समन्वयक' ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र जी चव्हाण व राज्य निवडणूक प्रभारी व महसूल मंत्री मा.ना.चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी ही राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती घोषित करत अनेक नेते व पदाधिकारी यांना निवडणुकी संदर्भातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. यापूर्वी आमदार विक्रांत पाटील यांनी अशा अनेक महत्त्वपूर्ण संघटनात्मक आणि निवडणुकीसंदर्भातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असल्याने या आगामी निवडणुकांमध्येही त्यांना ही महत्त्वपूर्ण 'राज्य निवडणूक समन्वयक' ही जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक ...