भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
खारघर/प्रतिनिधी-खारघर येथे दिनांक 13 व 14 डिसेंबर रोजी सेक्टर 19 येथील विरंगुळा केंद्रामध्ये प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी आधार कार्ड व मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी संधीचा लाभ घेत जवळपास दीडशे नागरिकांनी आपल्या आधार कार्ड मध्ये पत्त्या,नावामध्ये तसेच फोन नंबर लिंक करणे या सर्व सोयी सुविधांचा लाभ घेतला. खारघर पोस्ट ऑफिसच्या वतीने शून्य ते पाच वयोगटातील लहान मुलांचे देखील नवीन आधार कार्ड बनविण्यात आले. सदर शिबिरामध्ये प्रभागातील वय वर्ष 70 पेक्षा जास्त असलेल्या नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून त्याचे त्वरित वाटप देखील करण्यात आहे. युवाप्रेरणा सामाजिक संस्था ही नेहमीच खारघर मधील विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याचे प्रश्न घेऊन कार्यरत असते. सामाजिक बांधिलकी जपणे ही काळाची गरज आहे असे या वेळेस युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी सांगितले. भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी त्यांचा यावर्षीचा वाढदिवस साजरा करत असताना *प्रेम व्यक्त करा कृतीतून* या उक्तीप्रमाणे आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे समाजासाठी समाज उपयोगी उपक्रम राबवत कार्यररत असतो असे सांगितले. या शिबिरात भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे सचिव इम्तियाज बागलकोटे तसेच भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग प्रकोष्ठचे संयोजक नवनाथ गाढवे यांचे आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड काढण्यासाठी मोलाचे योगदान लाभले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सचिव आदित्य हातगे, युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे दिनेश यादव, गौरव पाटील, कुणाल देवकर, पायल पाटील, अनिकेत महाले, नितीन पाटील, रणजीत पाटील, जय पाटील, अंकित सौदा, युवराज जांगिड, योगेश मोरकर, ओमकार पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक त्रिभुवन काका यांचे देखील सहकार्य लाभले.


Comments
Post a Comment