Skip to main content

रायगडचे सुपुत्र अभिषेक मगर यांचा १८ जणांच्या "आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य" चमूत समावेश

 आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य पहिल्या सागरी प्रवासाला रवाना

पोरबंदर/मुंबई दि.३-भारतीय नौदलाने प्राचीन जहाज बांधणी शास्त्रानुसार केरळमधील सुप्रसिद्ध नौका रचनाकार बाबु शंकरन यांच्या नेतृत्वाखाली कारवार बंदरातील नौदल तळावर बनवीलेली आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य ही शिडाची नौका आपल्या पहिल्या लांबच्या सागरी प्रवासाला रवाना झाली.पोरबंदर ते मस्कत (ओमान) आणि परत कारवार या प्रवासासाठी सोमवार २९ डिसेंबर रोजी शानदार आणि भव्य लष्करी समारंभाने निघाली.याद्वारे भारताचा पश्चिम किनारा आणि ओमान यांना जोडणाऱ्या सागरी मार्गाचा आढावा घेण्यात येणार आहे.

     ही नौका ओमानपर्यंतचा १४०० किलोमीटरचा प्रवास १५ दिवसांत पूर्ण करून ओमानला पोहोचणार आहे.भारताचा पश्चिम किनारा आणि प्राचीन सागरी मार्गामुळे हिंदी महासागर क्षेत्रात व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मीळाली होती.आता या आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य मोहिमेमुळे भारत आणि ओमानमधील संबंध दृढ होतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.त्या अगोदर नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनी नौकेला नौदलाचा झेंडा दाखवून सागरी मोहिमेवर रवाना केले.याप्रसंगी ओमानचे राजदूत इस्सा सालेह अल शिबानी हे सुद्धा उपस्थित होते.



     कर्नाटकातील कारवार तळावर २१ मे २०२५ रोजी आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य नौदलात दाखल झाली होती.ही नौका म्हणजे हिंदुस्थानच्या प्राचीन आणि समृद्ध अशा सागरी वारशाचे प्रतीक आहे.हा वारसा जपणे व त्याचे पुनरूत्थान करण्याचा प्रयत्न या नौका नयनाच्या माध्यमांतून करण्यात आला आहे.या नौका बांधणीसाठी कोणताही आराखडा किंवा अवशेष उपलब्ध नसताना बाबू शंकरन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे दिव्य पार पाडले आहे.अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे लागले.


      त्यामध्ये पुरातत्त्व शास्त्रज्ञ,नौदल रचनाकार,पाण्यातील चाचणी तज्ञ आणि कारागिरांचा उल्लेख करावा लागेल असे नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.



    *भारताच्या प्राचीन वारशाचे प्रतीक असणारी ही नौका पहिल्या आणि लांबच्या सागरी प्रवासासाठी मस्कतला रवाना झाली.ही नौका संजीव सन्याल यांच्या मुख्य संकल्पनेतून साकार झाली आहे.संजीव संन्याल हे एक प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ,लेखक आणि सरकारी आर्थिक सल्लागार आहेत.*


*खास वैशिष्ट्ये*

#"आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य"ही नौका अजंठा लेण्यातील भित्तीचित्रावर आधारित आहे.पाचव्या शतकामध्ये अशा नौका वापरात होत्या.प्राचीन काळात उत्कृष्ट नौकानयनपटू कौंडिण्य यांनी मोठा प्रवास केला होता.त्याकाळी सागरी शक्ती म्हणून भारताचा लौकिक होता.


*नारळाच्या कार्यापासून तंतू निर्मिती*


काथ्या,नारळाच्या शेंड्या आणि जलरोधासाठी नैसर्गिक राळ यांचा वापर करून लाकडी फळ्यांची बांधणी


*नौकेची रचना*


लाबी-६५ फूट,प्रवासी क्षमता-१८


बांधणी-दोरीने फळ्या शिवण्याचे तंत्र (स्टिच-फ्लॅंक)


या नौकेच्या निर्मितीत एकही स्क्रू आणि पोलाद वापरले नाही.


*कोट*

"आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य" ही भारताची समृद्ध सागरी परंपरा दर्शवते.या नौकेची बांधणी करणाऱ्या रचनाकारांचे,कारागिरांचे आणि भारतीय नौदलाचे मी अभिनंदन करतो.


                   - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

प्राचीन नौकांच्या चित्रावरून "आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य" ची पूर्ण रचना केली आहे.ही नौका इतिहास, प्राचीन काळातील कारागिरी आणि आधुनिक नौदलातील तज्ञ यांचा संगम आहे.


                   -संरक्षण मंत्रालय

"आय.एन.एस.व्ही.कौंडिन्य" या नौकेवरील १७ दर्यावर्दी हे भारतीय नौदलाच्या वेगवेगळ्या विभागातील तज्ञ असून त्यामध्ये सध्या रायगडमध्ये वास्तव्यास असणारे अभिषेक मगर आणि मूळचे सातारा जिल्ह्यातील ढोरोशी गावचे सुपुत्र अभिषेक मगर यांचाही समावेश आहे.

        अभिषेक मगर हे वयाच्या २० व्या वर्षी भारतीय नौदलात दाखल झाले असून गेल्या १७ वर्षांपासून त्यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात खारघर येथे आहे.ते मुळचे सातारा जिल्ह्यातील ढोरोशी गावचे सुपुत्र आहेत.त्यांचा जन्म ९ मार्च १९९७ रोजी मुंबईतील कांदिवली या उपनगरात झाला असून बालवाडीपर्यंत ते तेथेच शीकले.तर इयत्ता ६ वी पर्यंत मूळ गावी पाटण तालुक्यातील ढोरोशी येथील जिल्हा परिषद शाळा नंतर खारघरमधील सुधागड एज्युकेशनच्या कोपरा हायस्कूल,१० वी नंतर खारघरमधील रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेज आणि शेवटी भारती विद्यापीठात इंजिनिअरींग करून नौदलाच्या स्पर्धा परिक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन भारतीय नौदलात दाखल झाले.गेल्या ९ वर्षांपासून नौदलाच्या वेगवेगळ्या शाखेत वेगवेगळ्या हुद्द्यावरती ते देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत.

        नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर याचे ते जेष्ठ चिरंजीव असून त्यांच्या कुटुंबाला मोठी लष्करी परंपरा लाभली आहे.









Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...