Skip to main content

Posts

Showing posts from January, 2026

रायगडचे सुपुत्र अभिषेक मगर यांचा १८ जणांच्या "आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य" चमूत समावेश

 आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य पहिल्या सागरी प्रवासाला रवाना पोरबंदर/मुंबई दि.३-भारतीय नौदलाने प्राचीन जहाज बांधणी शास्त्रानुसार केरळमधील सुप्रसिद्ध नौका रचनाकार बाबु शंकरन यांच्या नेतृत्वाखाली कारवार बंदरातील नौदल तळावर बनवीलेली आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य ही शिडाची नौका आपल्या पहिल्या लांबच्या सागरी प्रवासाला रवाना झाली.पोरबंदर ते मस्कत (ओमान) आणि परत कारवार या प्रवासासाठी सोमवार २९ डिसेंबर रोजी शानदार आणि भव्य लष्करी समारंभाने निघाली.याद्वारे भारताचा पश्चिम किनारा आणि ओमान यांना जोडणाऱ्या सागरी मार्गाचा आढावा घेण्यात येणार आहे.      ही नौका ओमानपर्यंतचा १४०० किलोमीटरचा प्रवास १५ दिवसांत पूर्ण करून ओमानला पोहोचणार आहे.भारताचा पश्चिम किनारा आणि प्राचीन सागरी मार्गामुळे हिंदी महासागर क्षेत्रात व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मीळाली होती.आता या आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य मोहिमेमुळे भारत आणि ओमानमधील संबंध दृढ होतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.त्या अगोदर नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनी नौकेला नौदलाचा झेंडा दाखवून सागरी मोहिमेवर रवा...