रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल चे नाव राज्यपातळीवरच नव्हे तर देश पातळीवर नेण्याचं काम माननीय प्राचार्य राज अलोनी मॅडम व त्यांचे सर्व सहकारी करत आहेत-किरण पाटील
खारघर/प्रतिनिधी दि.७- रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर यांच्या हिट्स डे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री किरण प्रकाश पाटील अध्यक्ष खारघर स्पोर्ट्स अकॅडमी यांना बोलवण्यात आले होते. आज या मैदानी खेळांच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर प्रसंगी उपस्थित राहत सहभागी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या वतीने विशेषतः संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे नेहमीच खेळाडूंना पाठबळ देत मदत करत असतात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी व आमच्या प्रभागातील रहिवाशी स्वस्तिका घोष ही आज आंतरराष्ट्रीय स्तरावर टेबल टेनिसपटू म्हणून खेळत आहे याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांनाच आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल चे नाव राज्यपातळीवरच नव्हे तर देश पातळीवर नेण्याचं काम माननीय प्राचार्य राज अलोनी मॅडम व त्यांचे सर्व सहकारी करत आहेत.



Comments
Post a Comment