चांगु काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,न्यूपनवेल(अधिकारप्रदत्त स्वायत्त)येथे आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा संपन्न
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळाचे संचालक तसेच पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.त्याचबरोबर चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य व मुंबई शहर झोन-१चे उपाध्यक्ष मा. प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मुंबई शहर झोन-१ सचिव डॉ.मनोज वर्मा , मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. व्ही. बी. नाईक व मुंबई उपनगर सचिव डॉ. निलम पाटील यांची उपस्थिती लाभली.
या स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठातील ४२२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच पुरुषांमध्ये प्रथम सर्वात्कृष्ट खेळाडूचे स्थान ठाकूर महाविद्यालय, कांदिवली, द्वितीय स्थान आर.जे. महाविद्यालय, घाटकोपर आणि तृतीय स्थान के. ई. श्रॉफ महाविद्यालय, कांदिवली यांनी पटकावले त्याचबरोबर महिला विभागामध्ये प्रथम सर्वात्कृष्ट खेळाडूचे स्थान ठाकूर महाविद्यालय, कांदिवली, द्वितीय स्थान एस.आय.ई.एस महाविद्यालय, नवी मुंबई आणि तृतीय वर्तक महाविद्यालय, वसई यांनी पटकावले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील जिमखाना विभागाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Comments
Post a Comment