पत्रकार संघटनांच्या आक्षेपांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचात सहभागी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींना दिला . या कायद्यातील तरतुदींवर विविध पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतली. महाराष्ट्रातील विविध १४ संघटनांनी एकत्रित येत पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच स्थापन केला होता. या मंचाची आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. पत्रकार अभिव्यक्ती मंचच्या वतीने एस.एम.देशमुख, संदीप चव्हाण, दिलीप सपाटे, यदु जोशी, विशाल सिंग, पंकज दळवी, इंद्रकुमार जैन, प्रदीप मैत्रा, दीपक भातूसे, श्रीकिशन काळे यांनी या मसुद्यातील विविध मुद्यांवरील पत्रकार संघटनांचे असणारे आक्षेप मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे प्रथमदर्शनी मत समाजाच्या...