भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागत असून नागरीकांना विविध सुविधा मिळत आहेत. त्याअंतर्गत टेंभोडे येथे गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून ओपन जिम बांधण्यात आली आहे. या जिमचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते शनिवारी लोकार्पण झाले.
यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, महादेव मधे, आसुडगावचे माजी सरपंच शशिकांत शेळके, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अशोक गडगे, सचीन चौधरी, सुभाष भोईर, राघो कडव, संतोष भोईर, महिला मोर्चा तालुका चिटणीस प्रतिभा भोईर, मारुती चिखलेकर, संदिप भोईर, निवृत्ती भोईर, ललिता भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
.jpg)
Comments
Post a Comment