पनवेल मधील प्रथम महिला लेफ्टनंट ऑफिसर म्हणुन नियुक्ती मिळवुन आपल्या कतृत्वाने उत्तुंग यश संपादन करून ऋचा दरेकर यांनी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. त्यांना मिळालेल्या या भरघोस यशामुळे रायगडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाच्या माध्यामतून ऋचा दरेकरचा सत्कार सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होत. यावेळी संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते ऋचा दरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेल महापलिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, अॅडव्होकेट संजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील, विजया कदम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
.jpg)
Comments
Post a Comment