Skip to main content

नामदेववाडीतील प्रश्न सिडकोशी चर्चा करून सोडविणार -लोकनेते रामशेठ ठाकूर


पनवेल (वार्ताहर) : वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नामदेववाडी येथील जागा व राहती घरी सिडकोने पुनर्वसन योजनेंतर्गत संपादित केलेली आहे, पण तेथील रहिवाशांचा काही प्रश्न उरला आहे. या संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागातील रहिवाशांनी भेटीस येऊन त्यांची समस्या मांडली आहे. या समस्येवर सिडकोशी चर्चा करून योग्य मार्ग काढू, असे आश्वासन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या शिष्टमंडळाला दिले.

नामदेववाडीत राहणारे नरेश म्हस्के, बाळाराम भोईर, जयश्री पाटोळे, निर्मला गायकवाड, विजू सांबर, कर्सन वाळू आदींसह इतरांची घरे सिडकोने संपादित करून निष्कासित केली आहेत. त्याबद्दल सिडको त्यांना विकसित प्लॉट देणार आहे, पण सहा महिने उलटून गेले तरी सिडकोने त्यांना विकसित भूखंड दिलेला नाही. त्यामुळे या कुटुंबांना अद्यापही भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. ही सर्व जण गरीब कुटुंबातील असल्याने वाढत्या महागाईत त्यांना घर भाड्याचा खर्च परवडत नाही आहे. या संदर्भात त्यांनी महेश साळुंखे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली असता साळुंखे यांनी त्वरित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत बैठक आयोजित करून त्यांना या नागरिकांच्या समस्या सांगितल्या व यातून सकारात्मक मार्ग काढण्याची विनंती केली.

या सर्व बाबींची माहिती घेऊन लवकरच सिडको या संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिले येथील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...