पनवेल,(प्रतिनिधी) -- करंजाडे परिसरातील योद्धांचा सामाजिक संस्थेत अग्रेसर असणारे सिरवी समाज सेवा संस्थाच्या वतीने दैनिक पुढारीचे पनवेल प्रतिनिधी पत्रकार रवींद्र गायकवाड यांना कोविड योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कोविड 19 च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत केलेल्या सामाजिक कार्य लक्षात घेता सिरवी समाजच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.यावेळी महामंत्री देवाराम चौधरी अध्यक्ष थानाराम सचीव वोरा राम व प्रमुख कार्यकर्ता कानाराम देदाराम भंवर लाल नगाराम तेजाराम देवाराम नेमाराम देवाराम विनोद सिरवी यांच्या करंजाडे वासीय उपस्तित होते.
कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांना मिळालेल्या सन्मानपत्रामुळे त्याचे पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, राजकिय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. पत्रकार रवींद्र गायकवाड कोरोनाच्या आधीही अनेक संकटकाळी त्यांनी नागरिकांना मदत केली आहे. त्यांच्या कार्याने अनेकदा सामान्यांचे जीवन सावरले आहे त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातही महत्वपूर्ण काम आहे. त्याचे कोरोना काळात केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment