पनवेल / प्रतिनिधी : राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे एमजीएम हॉस्पिटल या ठिकाणी पनवेल महानगरपालिका कोविड विभाग येथे कार्यरत डॉक्टर्स नर्सेस तसेच इतर स्टाफ कोविड योद्ध्याना पावसाळी छत्री यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सचिव डी. डी. गायकवाड, सहचिटणीस केवल महाडिक, उद्योजक रमण खुटले, तालुका संघटक ओमकार महाडिक व रहीस शेख यांच्यासह एम.जी.एम. मधील डॉक्टर्स आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास डॉ.सोनाली कालगुडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment