विमानतळावर होत असलेल्या कामांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी- शिवसेनेची मागणी
पनवेल दि.०२ (वार्ताहर)-विमानतळावर होत असलेल्या कामांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी अशी मागणी सिडकोचे संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार व दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील ह्यांनी केली आहे.
आज सिडकोचे संचालक डॉ. संजय मुखर्जी ह्यांची भेट घेऊन येणाऱ्या विमानतळावर होत असलेल्या कामांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच सदर ठिकाणी होत असलेल्या विमानतळावर विविध प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होणार असून प्रकल्पग्रस्त तरुणांना त्यासाठी लागणारी कार्यकुशलता शिकता यावी म्हणून अद्ययावत प्रशिक्षण केंद्र येथे उभारावे अशी विनंती केली. तसेच इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध असणे प्रचंड गरजेचे असून त्यासाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध होणे मह्त्वाचे आहे. इथला स्थानिक भूमिपुत्र कार्यकुशल झाल्यास तो इथे भविष्यात निर्माण होणाऱ्या असलेल्या रोजगारांसाठी तयार होईल असेही जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी सांगितले.
संपादक : संदेश सोनमळे ✍️
Comments
Post a Comment