खारघर (प्रतिनिधी)-काल रविवार दिनांक ११ जूलै रोजी सायंकाळी,खारघरमधील प्रभाग क्र.६ चे कार्यसम्राट आणि मनमिळाऊ नगरसेवक अॕड.नरेश ठाकूर यांच्या शुभहस्ते "एल-टाकोस" या मेक्सिकन स्ट्रीट कीचन नावाच्या उपहार-गृहाचे शानदार उदघाटन झाले.
उदघाटनाप्रसंगी अॕड.नरेश ठाकूर उपहार-गृहाचे मालक श्री.संकेत पाटील यांना उद्धेशून म्हणाले की,खारघरमध्ये अनेक नामांकित आणी दर्जेदार उपहार-गृहे आहेत.त्यामध्ये आता संकेत पाटील यांच्या,"एल-टाकोस" या मेक्सीकन स्ट्रीट किचनची भर पडली असून ते लवकरच खाद्य-पदार्थांच्या आणि सेवेच्या दर्जामुळे संपूर्ण खारघरमध्ये लौकिक प्राप्त करेल यामध्ये कोणतीही शंका नाही.माझ्या इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ.रंजना पाटील यांचे भाचे श्री.संकेत पाटील हे या उपहारगृहाचे मालक असून,या उपहारगृहाचे उदघाटन माझ्या हस्ते करण्याचा त्यांनी निर्णय घेतला याचा मला खूप आनंद आहे.संकेतजी,आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून खारघरकरांच्या जिभेची चव भागवून,व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती साधाल याची मला खात्री आहे. माझ्याकडून आपल्या या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.
उपहार-गृहाच्या उदघाटनाप्रसंगी मा.श्री.धर्मा तोडेकर,संतोष तांबोळी,श्री.भंडारी,सौ.रंजना पाटील उपहार-गृहाचे मालक संकेतजी पाटील इतर मान्यवर तसेच सेक्टर-१० आणि कोपरा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment