पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पैसे जबरदस्तीने चोरी करण्याच्या उद्देशाने दोघा जणांनी मारुती सुझुकी गाडीवर बंदुकीने गोळ्या झाडून तसेच सदर गाडीच्या काचा फोडून त्याच्याकडील पैसे जबरीने चोरण्याचा प्रयत्न करून पसार झाल्याची घटना पनवेल जवळील पुष्पकनगर झोपडीजवळील डांबरी रस्त्यावर घडली आहे.
सुनील गाडेकर (36) हे त्यांच्या मारुती सुझुकी गाडी क्र.एमएच-01-एई-9403 ही सोबत घेवून असताना दोन अज्ञात इसम मोटार सायकलवरुन आले. त्यातील एकाची उंची 5 फूट 5 इंच, डोक्यात निळ्या राखाडी रंगाची मंकी कॅप, डोळे लालसर, काळ्या रंगाचा हाफ रेशनकोट तर मोटार सायकलच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांना धमकावून पैशाची मागणी करून त्यांच्या गाडीवर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. त्याची उंची अंदाजे 5 फूट 8 इंच, डोक्यात लाल पिवळ्या रंगाची मंकी कॅप, त्याच्या कपाळावर पक्षाचे निशाण, डोळे लालसर व त्याने काळ्या रंगाचा हाफ रेनकोट घातला आहे. या इसमाबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment