खारघर (प्रतिनिधी) -सन २०१६ पासून खारघर भाजपा पदाधिकारी सातत्याने खारघर शहरातील रस्त्यांच्या संदर्भात रिसर्फेसिंग करण्याबाबत सिडकोकडे पाठपुरावा करत होते.अनेक ठिकाणांचे सिडको अधिकार्यांसोबत संयुक्तपणे सर्वेक्षण करण्यात आले.त्यास यश येऊन खारघर शहरातील रस्त्यांचे २०१९ पासून रिसर्फेसिंग करण्यात येत आहे.
असे असले तरी अनेक ठिकाणी दहा बारा वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेऊन २०२१ च्या पावसाळ्यापूर्वी त्याही रस्त्यांची डागडुजी करून ते मोटरेबल(कार चालवण्या योग्य) करावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.या मागणीला अनुसरून खारघरमध्ये अनेक ठिकाणी चौकांमध्ये डांबरीकरणाची कामे चालू झाली आहेत.याच कामाअंतर्गत प्रभाग ४ मधील सेक्टर २० व सेक्टर २१ मधील रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत एक पत्र खारघर तलोजा मंडल अध्यक्ष श्री. ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सिडको अधिकार्यांना दिले होते.सदर सुरवात झाली असून त्या कामाची पाहणी काल करण्यात आली व आवश्यक सूचना करण्यात आल्या.पावसाळ्यापूर्वी हि कामें करण्यात येतील असे सिडको अधिकार्यांनी चर्चा करतांना सांगितले.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment