रायगड (प्रतिनिधी) : आज 348 वा शिवराज्याभिषेक दिन मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी युवराज छ. खा. संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भुमीका मांडली. लोकप्रतिनिधी, सरकार यांना लक्ष करीत गोरगरीब मराठा समाजाची बाजु संभाजी यांनी यावेळी मांडली. राजकरण करू नका असा सल्ला लोक प्रतिनिधींना देत 16 जुन रोजी शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरून आंदोलनची घोषणाही त्यांनी केली. लोकप्रतिनिधी आणि सरकारला धारेवर धरत खा. संभाजी राजे यांनी पुणे मुंबई लाँग मार्चचा इशारा दिला. यावेळी लाठी मारायची असेलतर पहिली लाठी छत्रपतींच्या वंशजांना मारायला लागेल असे हि त्यांनी यावेळी जाहिरपणे किल्ले रायगडच्या राजसदरेवरून सांगितले.
यावेळी रायगडवरील रहिवाशी विठ्ठल औकिरकर यांचा सत्कार करण्यात आला. या औकिरकर कुटूंबीयांनी आपल्या देवघरात पिढ्यान पिढ्या पुजेसाठी ठेवलेले अस्सल सोन्याचा होन दिल्या बद्दल हा सत्कार करण्यात आला.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment