पनवेल : उत्कर्ष को. ऑपरेटिव्ह हौ. सोसायटी, से ११, खांदा कॉलनी यांच्या मागणी नुसार जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थे तर्फे दिनांक ०३/०६/२०२१ सोसायटीच्या आवारातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. सदर प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे, मा.उपनगराध्यक्ष श्री गणेश पाटील, मा. नगरसेवक श्री शिवाजी थोरवे, ज्येष्ठ नेते श्री अनिल बंडगर, मा. नगरसेविका श्रीमती वंदना भगत, युवा अध्यक्ष वैभव गलंडे, युवा नेते पंकज वाघ, युवा नेते सचिन मोकल सोसायटी पदाधिकारी श्री माधव पाटील, श्री गुलाब साखरे, श्री रवींद्र निप्रुळ, श्री बाजीराव मोहिते, श्री बबन कांबळे, श्री सुनिल देशपांडे, श्री आबा माने, श्री शिवकर गुरूजी, श्री अशोक कारंडे, श्री श्रीराम कानाल,सौ भारती मोहिते, सौ मालन गेजगे उपस्थित होते. यावेळी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी रस्त्याचे डांबरीकरण केल्याबद्दल जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे व प्रितमदादा म्हात्रे यांचे आभार मानले.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment