भ्रष्टाचाऱ्यांना शासन होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
- माजी सरपंच जयवंत परदेशी उर्फ आमदार.
वडघर ग्रामपंचायत हद्दीतील भ्रष्टाचाराचे एक प्रकरण माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते जयवंत परदेशी उर्फ आमदार यांनी बाहेर काढले आहे. कुठल्याही स्वरूपाचे काम न करता तब्बल 2 लाख 94 हजार रुपये लाटण्याचा हा प्रकार प्रथमदर्शनी दिसून येतो. अशाप्रकारे अनेक प्रकरणांतून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा जयवंत परदेशी यांचा दावा आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शासन करण्यासाठी गरज पडल्यास कोर्टाचे दरवाजे ठोठावेन अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर भ्रष्टाचाराची सारी प्रकरणे उकरून काढण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सीआयडी चौकशी लावण्याची ते लवकरच मागणी करणार आहेत.
याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की, ग्रामपंचायत वडघर हद्दीतील चिंचपाडा शील येथे अरविंद पाटील यांचे घर ते नरेश परदेशी यांच्या घरापर्यंत रस्ता बांधण्याचे काम साल 2020- 21 च्या चौदाव्या वित्त आयोगानुसार ग्रामनिधी मधून करण्याचे योजले गेले.त्यास्वरुपाचा ठराव देखील झाला.त्यासाठी 2 लाख 94 हजार 144 रुपयांचा निधी खर्च केला गेला.हे काम शाम बबन पाटील या ठेकेदारास दिले गेले.परंतु आजमितीला येथे कुठलाही रस्ता अस्तित्वात नाही.मूळ वहिवाट स्वरूपातील कच्ची पाय वाट अजून तशीच्या तशी आहे.त्यावर रस्त्याचा लवलेश सुद्धा दिसून येत नाही.त्यामुळे कुठलेही काम न करता बिले काढण्याचा प्रकार याठिकाणी झाला असल्याचा आरोप जयवंत परदेशी यांनी केला आहे.
भ्रष्टाचाराच्या या व यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये सरपंच रविकांत कमलाकर भोपी,प्रदीप तुकाराम मुंडकर पंचायत समिती चे बांधकाम विभागातील अभियंते मंगेश सावंत आणि ग्रामसेवक दगडू उत्तम देवरे हे गुंतले असून त्यांनी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा अपहार वडघर ग्रामपंचायतीमध्ये केल्याचा आरोप जयवंत परदेशी यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तसेच या सारख्या अन्य भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना उजेडात आणण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सीआयडी चौकशीची मागणी करणार असल्याची भूमिका जयवंत परदेशी यांनी मांडली.
चौकट.
ग्रामपंचायत वडघर हद्दीतील सर्वे क्रमांक 61/2 मधील 0.33.90 क्षेत्रफळ हद्दीत रस्ता बांधण्याची कुणी मागणी केली होती काय? असा अर्ज केला असता कुणीही सदर कामाची मागणी केली नसल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी स्वरूपाचे उत्तर प्राप्त झाले आहे. याचाच अर्थ कुठलीही गरज नसताना, कोणाचीही मागणी नसताना ग्रामपंचायतीच्या वतीने केवळ कागदोपत्री हे काम दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार या ठिकाणी सिद्ध होतो.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

Comments
Post a Comment