पनवेल (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर हे अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी येथील आयकर भवनजवळ करण्यात आला. या वेळी त्यांनी ही वसुंधरा सुंदर व्हावी यासाठी आपल्याकडून जे योगदान देता येईल त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने खांदा कॉलनी येथील आयकर भवनसमोर चला करूया वृक्षारोपण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती क सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नगरसेविका सीता पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, शशिकांत शेळके, मोतीलाल कोळी, संजय जैन, अॅड. चेतन जाधव, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, परमेश्वर गिरे, चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, अभिषेक भोपी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment